Ragunathdada Patil: साखर कारखान्यांतून साखर बाहेर पडू देणार नाही : रघुनाथदादा पाटील

येत्या काही दिवसांत गनिमी काव्याच्या माध्यमातून आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
ragunathdada patil
ragunathdada patilsaam tv
Published On

Satara News :

चालु वर्षाच्या ऊसाला ३५०० रुपये दर मिळावा आणि मागील ऊसाचे १०० रुपये टनाला मिळावेत अशी शेतक-यांची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास साखर कारखान्यांतून साखर बाहेर पडु देणार नाही असा इशारा रघुनाथदादा पाटील (Ragunathdada Patil) यांनी प्रशासनास दिला आहे.(Maharashtra News)

सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना ऊस दराबाबत आक्रमक झाल्या नंतर ऊस कारखानदार आणि शेतकरी संघटना यांची बैठक जिल्हाधिकारी यांनी बोलावली हाेती. काही वेळापूर्वीच ही बैठक संपली. या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे शेतकरी संघटनांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ragunathdada patil
Sugar Factories: दोन माजी सहकारमंत्र्यांसह मातब्बर नेत्यांच्या कारखान्यांना साखर सहसंचालकांनी बजावली नोटीस; जाणून घ्या कारण

चालु वर्षाच्या ऊसाला ३५०० रुपये दर मिळावा आणि मागील ऊसाचे १०० रुपये टनाला मिळावेत या मागणी बाबत कारखानदारांकडुन बैठकीत चर्चा करण्यातच आली नाही असे सांगण्यात आले. सगळे कारखान्याचे अधिकारी होते यामुळं यावर निर्णय निघुच शकत नाही असं रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलं.

आज जिल्हाधिकारी हे वरिष्ठ स्थरावर चर्चा करुन आजच संध्याकाळी निरोप देणार आहेत असंही त्यांनी म्हटले. जर आमची मागणी मान्य झाली नाही तर मात्र कारखान्यातुन साखर बाहेर पडु दिली जाणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला. येत्या काही दिवसांत गनिमी काव्याच्या माध्यमातून आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

ragunathdada patil
Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; पंढरपूर तालुक्यात ११ हजार एकरावरील द्राक्ष बागांचे नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com