Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार, भरधाव कंटेनरने प्रवासी रिक्षाला उडवलं; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

Pune Auto Rickshaw And Container Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कंटेनरने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनचा थरार घडलाय. पुणे -सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झालेत. सोलापूर रोडवरील सिद्धिविनायक पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. या अपघाताचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे -सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी येथे आज दुपारी रिक्षा आणि कंटेनरचा अपघात झाला. शेवाळवाडी चौक येथे ही घटना घडली. रिक्षामधून ४ जण प्रवास करत होते. यामधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झालेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले.

रवींद्र चौधरी, बंटी चौहान, प्रदुमन राज, सुनील कुमार हे सर्वजण गंभीर जखमी झाले होते. हे सर्वजण पुण्यातल्या मांजरीमधील महादेवनगरमध्ये राहतात. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या चौघांपैकी दोघांनी घटनास्थळावरच प्राण सोडले. तर इतर दोघांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातानंतर रिक्षा चालक आणि डंपर चालक यांना शोधून घेत ताब्यात घेतले. पोलिस या अपघाताचा तपास करत असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

SCROLL FOR NEXT