Sassoon Hospital: ससून हॉस्पिटलमध्ये आणखी एक घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच हडपले 4 कोटी 18 लाख रुपये

Pune Sassoon Hospital : पुणे शहरातील ससून हॉस्पीटलमागील संकट काही थांबता थांबत नाहीत. एकामागोमाग वादात ससून हॉस्पीटलचं नाव सापडत आहे. ड्र्ग्सनंतर आता घोटाळ्यात ससूनचं नाव चर्चेत आले आहे.
Sassoon Hospital: ससून हॉस्पिटलमध्ये आणखी एक घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच हडपले 4 कोटी 18 लाख रुपये
Pune Mirror
Published On

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

आता बातमी येतेय पुण्यातून. तुम्ही ही बातमी पाहून म्हणाल ससूनमध्ये चाललंय तरी काय? होय, सूसन पुन्हा एकदा चर्चेत आलंय. ससूनमध्ये तब्बल सव्वा चार कोटींचा घोटाळा झालाय.हा घोटाळा करणारे कोण आहेत? कसा केला घोटाळा पाहुयात हा रिपोर्ट.

ससून हॉस्पिटल पुन्हा एकदा घोटाळ्यामुळे चर्चेत आलंय. हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच कोट्यवधींचा अपहार केल्याचं समोर आलंय..अकाऊंटंट आणि रोखपाल या दोन्ही मुख्य आरोपींनी सह्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आणि रुग्णालयाच्या बँक अकाऊंटमधून स्वत:च्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात 4 कोटी 18 लाख जमा केले, असा आरोप करण्यात आलाय.या घोटाळ्यात.

ससूनमध्ये कर्मचाऱ्यांकडूनच घोटाळा

ससूनचे अकाऊटंट अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार मुख्य आरोपी आहेत

सह्यांचा अधिकार वापरून ससूनच्या खात्यातील पैसे बेकायदेशीरपणे स्वत:च्या खात्यात पाठवले

माने आणि चाबुकस्वार यांनी अधिकाराचा गैरवापर करत ससूनचे 4 कोटी 18 लाख रुपये वळवले.

याप्रकरणी 23 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...मात्र, या घोटाळ्याबाबत अधीक्षकांना माहिती नसल्याचं ससूनच्या डीननी म्हटलंय. तर ससूनधील भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते दादा गायकवाड यांनी 10 दिवस उपोषण केलं होतं. तरीही डीनने अधीक्षकांर कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे आता ससूनमध्ये घोटाळ्यात आणखी कुणाचा आहे का...? या कर्मचाऱ्यांना कुणी पाठिशी घालतंय का? असे सवाल आता उपस्थित होतायत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com