Bulldozer Rolled Over An Illegal Pub In Pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident: हिट ॲंड रन प्रकरणानंतर पुणे महापालिका अ‍ॅक्शन मोडवर; बेकायदेशीर पबवर बुलडोझर फिरवला

Pune Hit and Run Car Accident: कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बुलडोजर आणि जेसीपीच्या साह्याने अतिक्रमण

Ruchika Jadhav

सागर आव्हाड, पुणे

हिट ॲंड रन प्रकरणानंतर पुणे महापालिका अतिक्रमण विभाग अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बुलडोजर आणि जेसीपीच्या साह्याने अतिक्रमण विभागाने पबचे बांधकाम पाडले आहे.

कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाई करण्यात आली आहे. थेट बुलडोझर आणि जेसीपीने हे बांधकाम पाडले जातं आहे. पुण्यातील हिट ॲंड रन प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतलीये. पुणे शहरात पबच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. येरवडा पोलीस ठाण्यावर आजा हा मोर्चा काढला जाणार आहे.

जर पब बंद झाले नाहीत तर पबची तोडफोड करणार, असा इशारा देखील ठाकरे गटाने दिला थेट. पुणे शहरातील पब बंद करा दोनच पबवर कारवाई का? असा सवालही ठाकरे गटाकडून पोलिसांना विचारण्यात आलाय.

पुण्यातील पबमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांची भागीदारी

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पबवरून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हिट अँड रन प्रकरणानंतर पुण्यातील पब संस्कृती बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.अशातच पुण्यात वाढत चाललेली पब संस्कृती कायमची संपली पाहिजे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुण्यातील अनेक पबमध्ये अनेक पोलिसांचीच भागीदारी असून अनेक पोलीस खात्यातील पोलीस कर्मचारी हे नाचताना पाहायला मिळालेत, असा गंभीर आरोप देखील धंगेकर यांनी केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

SCROLL FOR NEXT