Pune Accident News: पुणे अपघातातील आरोपी कुटुंबियांचे छोटा राजनशी संबंध? चक्रावून टाकणारी माहिती उघड

Pune Porsche Accident Case Update : प्राप्त माहितीनुसार, विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्रकुमार यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध होते. यापूर्वी देखील खूनाच्या प्रकरणात अग्रवाल कुटुंबियांनी पोलिसांवर दबाव आणल्याचे समोर आले आहे.
Pune Porsche Accident Case Update
Pune Porsche Accident Case UpdateSaam TV

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात गेल्या शनिवारी भयानक घटना घडली. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने सुसाट कार चालवत दोघांना चिरडलं. या अपघाताप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता, असं स्पष्ट झालं आहे.

Pune Porsche Accident Case Update
Pune Porsche Accident : विशाल बिल्डरच्या मुलावर आमदार पत्नीचे गंभीर आरोप; कारनामे केले उघड

अपघातापूर्वी अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत बारमध्ये बसलेला होता. त्यानंतरही घरी जाताना त्याने सुसाट कार चालवली आणि दोन जणांचा जीव घेतला. याप्रकरणी मुलाच्या हातात कार दिल्याने पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

त्यांना संभाजीनगर येथून अटकही केली आहे. दरम्यान, विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्रकुमार यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध होते.

यापूर्वी देखील खूनाच्या प्रकरणात अग्रवाल कुटुंबियांनी पोलिसांवर दबाव आणल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादात सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती.

अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नांमध्ये सुरेंद्रकुमार यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांत हा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेंद्रकुमार यांनी पोलिसांवर दबाव देखील आणल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात आरोपपत्र दाखल होईपर्यंत विशाल अग्रवालच्या वडिलांना अटक झाली नव्हती. मोक्का लावणं अपेक्षित असताना देखील आयपीसी सलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विशाल बिल्डरच्या मुलावर आमदार पत्नीचे गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीने विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाच्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. अग्रवाल यांचा मुलगा शाळेत माझ्या मुलाला विनाकारण त्रास होता. यासंदर्भात मी त्याची तक्रार अग्रवाल यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी याकडे लक्ष दिले नाही, असं सोनाली यांनी म्हटलं आहे.

Pune Porsche Accident Case Update
Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस आक्रमक; तो VIDEO पोस्ट करत पोलिसांना विचारले ५ कळीचे प्रश्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com