Pune MPSC aspirant found dead inside locked room Saam
मुंबई/पुणे

Pune: MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास; पुण्यात खळबळ

Pune MPSC aspirant found dead inside locked room: पुण्यातील विश्रामबाग परिसरात २६ वर्षीय एमपीएससी विद्यार्थ्यानं आत्महत्या केलीये. विद्यार्थ्यानं खोलीला आतून लॉक लावून गळफास घेतलाय. पोलीस तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • पुण्यात एमपीएस सीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

  • गळफास घेऊन आज सकाळी ८ वाजता केली आत्महत्या

  • २६ वर्षीय सागर पवार असे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव

सचिन जाधव, साम टिव्ही

पुण्याच्या विश्रामबागेतून तरूणाच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. एमपीएससीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं. तरूणानं खोलीला आतून लॉक लावलं. तसेच गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना अद्याप सुसाईड नोट सापडली नाही. तरूणानं कोणत्या कारणामुळे आयुष्य संपवलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सागर पवार (वय वर्ष २६) असे मृत तरूणाचे नाव आहे. सागर हा मुळचा बुलडाण्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो पुण्यात एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करत होता. त्यानं सकाळी ८ वाजता राहत्या खोलीला आतून लॉक लावला. तसेच गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ सागर खोलीबाहेर आला नाही म्हणून काहींनी दार ठोठावला. मात्र, दार कुणी उघडत नसल्याचं कळताच दार तोडण्यात आलं.

दार उघडताच हे प्रकरण समोर आलं. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी खोलीची तपासणी केली. मात्र, सुसाईड नोट सापडली नाही. दरम्यान, तरूणाच्या कुटुंबाची चौकशी केल्यानंतर अधिक माहिती मिळेल, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांना तरूणानं एमपीएससी परीक्षाच्या नैराश्यातून आत्महत्या केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तरूणानं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस अधिक करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्याात सकाळपासून दुसरी आत्महत्येची उघडकीस आली आहे. या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले म्हणतात, 'पुण्यात विवाहितेनंतर विद्यार्थ्यानंही टोकाचं पाऊल उचललं. पुण्यात झोन- 1 च्या हद्दीत 2 दिवसांत सलग दोन आत्महत्येचं प्रकरण समोर आलं आहे. बुधवार पेठेत आठव्या मजल्यावरून उडी घेत विवाहित महिलेनं आयुष्य संपवलं'.

'आत्महत्याग्रस्त महिलेनं सुसाईड नोट लिहिल्याची माहिती आहे. घरातील जबाबदारी नीट पार पाडता येत नसल्यानं आत्महत्या केल्याचा उल्लेख त्या महिलेनं सुसाईड नोटमध्ये केला आहे. दरम्यान, सुसाइड नोटमधील हस्ताक्षर जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमपीएससीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या केली. परीक्षेच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे', अशी माहिती पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

Maharashtra Live News Update:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

SCROLL FOR NEXT