पुण्यातील बुधवार पेठेत भयंकर घडलं; चिठ्ठी लिहून तरूणीनं ९व्या मजल्यावरून उडी घेतली, आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

Young Woman Ends Life Police Recover Letter: पुण्यातील बुधवार पेठेत १९ वर्षीय तरूणीनं ९व्या मजल्यावरून उडी घेत आयु्ष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली.
Young Woman Ends Life Police Recover Letter
Young Woman Ends Life Police Recover LetterAI Photo
Published On

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात गुरूवारी सायंकाळी एक तरूणीनं आत्महत्या केली. इमारतीतील ९ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. ही तरूणी नेमकी कोण? तरूणीनं टोकाचं पाऊल का उचललं? तरूणीसोबत नेमकं घडलं काय? असे अनेक प्रश्न काल निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलीस तपासात काही प्रश्नांचं कोडं सुटलं आहे.

पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना सुसाईड सापडली आहे. या सुसाईड नोटमधून सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसी (वय वर्ष १९) असे मृत तरूणीचे नाव आहे. तिनं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमधून तिनं आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

Young Woman Ends Life Police Recover Letter
नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

तरूणीनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, 'मी माझ्या घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मी स्वत:हून टोकाचं पाऊल उचलत आहे. मला या कामाचा कंटाळा आल्यामुळे स्वत:हून आयुष्य संपवत आहे', असं सुसाईड नोटमध्ये लिहून तिनं आयुष्य संपवलं. तिनं इमारतीतील ९ व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलं.

Young Woman Ends Life Police Recover Letter
मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरूणी मागील काह दिवसांपासून याच इमारतीमध्ये वास्तव्यास होती. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणले असून, सध्या पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com