MHADA Homes Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Homes: पुण्यातील हिंजवडी, वाकडमध्ये फक्त २८ लाखात घर; खरं की खोटं? म्हाडाने दिली माहिती

Pune Wakad Hinjawadi Mhada Homes: पुण्यात हिंजवडी, वाकड येथे म्हाडाने लॉटरी काढली आहे. फक्त २८ लाखात घर मिळत असल्याची माहिती व्हायरल होत आहे. दरम्यान, ही माहिती खोटी असल्याचे आता म्हाडाने स्पष्ट केले आहे.

Siddhi Hande

पुण्यात वाकड, हिंजवडीत म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी

२८ लाखात मिळणार घरे?

म्हाडाने सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती

पुणे शहरात घरं घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यात हिंजवडी, वाकडसारख्या परिसरात घर घेणे म्हणजे अनेकांचे स्वप्न आहे. येथे घरांच्या किंमती खूप जास्त आहेत. दरम्यान, अशातच पुण्यात हिंजवडी आणि वाकडमध्ये म्हाडाने लॉटरी काढली काढली असल्याची एक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत होती. दरम्यान, आता यावर म्हाडाने ट्विट करत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या पुणे विभागाने सोशल मीडियाद्वारे ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे म्हाडाने म्हटलं आहे. याबाबत म्हाडाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

२८ लाखात पुण्यात घर? (Pune Mhada Homes At 28 Lakh)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत वाकड आणि हिंजवडीमध्ये २८ ते ३० लाखांनी फ्लॅट्स विकले जात असल्याची माहिती पसरवली जात होता. या प्लॅटची किंमती ९० लाख रुपये आहे, अशी दिशाभूल करणारी माहिती ऑनलाइन प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये म्हाडाचा लोगोदेखील वापरला गेला आहे.

हे सर्व अहवाल पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. कोणत्याही व्यक्तीला असे दावा करण्याचा किंवा म्हाडाचा लोगो वापरण्याचा अधिकार नाही. हे कृत्य नागरिकांची फसवणूक करण्यासारखे आहे, असं पुणे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे म्हाडा बोर्डाचे आवाहन

पुणे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, अर्जदारांनी अर्ज सादर करण्यासाठी आणि माहितीसाठी फक्त म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. चुकीची माहिती किंवा बनवाट सोशल मिडिया पोस्ट, खोटी आश्वासने देणाऱ्या दलालांना बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या चरणी 5 कोटी 18 लाखांचे दान

Peacock Lifespan: किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी, उत्तर वाचून व्हाल थक्क

Dharmendra Health Update:ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; कुटुंबातील सर्व सदस्य पोहोचले रुग्णालयात

Pani Puri Receipe: नेहमीचं चटपटीत पाणी सोडा, पाणीपुरीसाठी ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल झणझणीत पाणी

अखेर मनोमिलन झालं! शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादींची युती|VIDEO

SCROLL FOR NEXT