Pune : म्हाडा कॉलनीत वरिष्ठ लिपिकाची आत्महत्या, पुण्यात खळबळ

Nitin Salve MHADA senior clerk suicide reason : पुण्यातील पर्वती म्हाडा कॉलनीत मुंबई इमारत दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ लिपिक नितीन साळवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
MHADA clerk Nitin Salve news updates
MHADA clerk Nitin Salve news updatesSaam TV Marathi News
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Parvati MHADA colony suicide case : मुंबई इमारत दुरूस्ती मंडळात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक नितीन साळवे यांनी म्हाडा कॉलनीतील आपल्या घरात आयुष्याचा दोर कापला आहे. ४५ वर्षाच्या साळवे यांनी पुण्यातील पर्वतीमधील लक्ष्मीनगर येथे असलेल्या म्हाडा कॉलनीत गळफाश घेऊन आत्महत्या केली. साळवींच्या जाण्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेची नोंद करण्यात आली. या घटनेने पुण्यातील सहकारी व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

४५ वर्षाच्या साळवे यांनी आयुष्याचा दोर का कापला? याबाबत पर्वती पोलीस ठाण्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादाला कंटाळून वरिष्ठ लिपीक नितीन साळवे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जातेय. शनिवारी दुपारी चार वाजता साळवे यांनी पुण्यातील राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा दोर कापला. या घटनेनं नितीन साळवे यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर पसरला.

MHADA clerk Nitin Salve news updates
Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

नितीन साळवे हे मुंबई इमारत दुरुस्ती मंडळात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दुपारी त्यांनी घराचा दरवाजा अनेक तासानंतरही उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता साळवे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MHADA clerk Nitin Salve news updates
Phaltan Doctor death : फार्महाऊसवरून बनकरच्या मुसक्या आवळल्या, प्रमुख आरोपी PSI बदने फरारच

प्राथमिक तपासात घरगुती वादामुळे मानसिक तणाव निर्माण झाल्याचे समोर आलेय. तरीसुद्धा आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी पंचनामा करून सविस्तर तपास सुरू केला आहे. साळवे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्वती पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.

MHADA clerk Nitin Salve news updates
Vande Bharat Express : पुण्याहून धावणार आणखी एक वंदे भारत, ५५० किमीचा प्रवास फक्त ७ तासात, वाचा कोणकोणते थांबे असतील?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com