Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?

Pune swargate To Katraj Metro: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज मेट्रो स्थानकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता या मेट्रो मार्गात ३ नव्हे तर ५ मेट्रो स्थानके असणार आहेत.

Siddhi Hande

पुण्यात सगळीकडे मेट्रोचे जाळे पसरत आहे. यामुळे पुणेकरांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचत आहेत.पुण्यात रोज हजारो लोक मेट्रोने प्रवास करतात. आता मेट्रोचे हे जाळे वाढवले जात आहेत. आता मेट्रोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Pune Metro News)

दक्षिण पुण्यात मेट्रोची पाच स्थानके असणार आहेत.स्वारगेट ते कात्रज मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये बदल करण्यात आला आहे.शहरातील दक्षिण भागातील स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये बदल करण्यात आले आहे.

या मार्गावर ३ ऐवजी ५ भूमिगत मेट्रो स्टेशन तयार केली जाणार आहे.त्यामुळे प्रवाशांना तर फायदाच होणार आहे. त्यांना आपल्या जवळच्या स्टेशनवरुन मेट्रो पकडता येणार आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मागार्चे काम पूर्ण झाले आहे.वनाज ते रामवाडी, पिपंरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. यामधील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गाचे दोन्ही बाजूला विस्तारीकरण केले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड ते निगडी पर्यंत मार्ग असणार आहय याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मंजूरी देऊन त्याचेही काम निविदा काढून लवकरच सुरू केले जाणार आहे.

नवीन मेट्रो स्टेशनची नावे

मार्केटयार्ड -उत्सव हॉटेल चौक, बिबवेवाडी/सहकारनगर – नातूबाग, पद्मावती -श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ, बालाजीनगर- भारती विद्यापीठ, कात्रज – कात्रज बसस्टँड ,किनारा हॉटेल जवळ

पुणेकरांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरु होणाऱ्या मेट्रोबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा मेट्रो मार्ग हा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरु केला जाणार आहे. यामुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीपासून बचाव होणार आहे. त्यांना ट्राफिकचा सामना करावा लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT