PCMC Budget : पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर! शहराच्या तुलनेत भोसरीला झुकतं माप

Pcmc Budget 2025-26: अण्णासाहेब मगर स्टेडियम,34 डीपी रोड सिटी सेंट, पाणी पुरवठा सुरळीत करणे यासह अनेक घटकांचा समावेश या अर्थसंकल्पनात केला आहे.
pcmc budget 2025-26
pcmc budget 2025-26Saam Tv
Published On

गोपाल मोटघरे,साम टीव्ही

पुणे: पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज 2025-26 या आर्थिक वर्षाचा 6 हजार 256 कोटीचं अर्थसंकल्प सादर केला आहे.तर केंद्र सरकार मार्फत अनेक योजनांसह 9 हजार 675 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, पर्यावरण अशा पायाभूत सुविधांवर भर दिला आहे.तर पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर देखील विशेष लक्ष दिले आहे.

pcmc budget 2025-26
Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण

इतर विभागाच्या तुलनेत भोसरीला झुकत माप!

भाजपच्या चारही आमदारांनी स्वतःच्या मतदारसंघाला अधिक निधी मिळावा यासाठी प्रशासनावर दबाव टाकल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रत्यक्षात अर्थसंकल्प पाहता भोसरी विधानसभेला अधिक निधी मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. तर पिंपरी आणि चिंचवडसाठी निधी तुलनेने कमी वाटप झाल्याची चर्चा आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी या मुद्यावर भाष्य करताना सांगितले की शहराच्या विकासाच्या गरजा पाहून निधींचे वाटप केले आहे. कोणत्याही विशिष्ट भागाला झुकतं माप देण्याचा हेतू नाही. असे ते म्हणाले.

pcmc budget 2025-26
Pimpari-Chinchwad News : पिझ्झा मागवला म्हणून वसतिगृहातून बाहेर काढलं; वसतिगृह प्रमुखांचा मोठा खुलासा | Video

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी

- विकासकामांसाठी 1962.72 कोटी रकमेची तरतूद

- शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी 128 कोटींची तरतूद

- पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या हेतूने 300 कोटींची तरतूद

- स्थापत्य विशेष योजनांसाठी 753.56 कोटींची तरतूद

- शहरी गरिबांसाठी 1898 कोटींची तरतूद

- पीएमपीएमएल (बस) साठी 417 कोटींची तरतूद

- पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी 160 कोटींची तरतूद

- भूसंपदानासाठी 100 कोटींची तरतूद

- जेंडर बजेट - महिलांच्या विविध योजनांसाठी 83 कोटींची तरतूद

- दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 62 कोटींची तरतूद

- अमृत 2.0 योजनेसाठी 55.48 कोटींची तरतूद

- स्मार्ट सिटीसाठी 50 कोटींची तरतूद

- अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेसाठी 10 कोटींची तरतूद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com