Pune Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro 3: पुणेकरांना नवीन वर्षात खुशखबर मिळणार; हिंजवडी मेट्रो लाइन होणार सुरु; तारीख आली समोर

Pune Metro 3 Shivajinagar To Hinjawadi Line Start Soon: पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुढच्या वर्षी पुणे मेट्रो लाइनचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवास सुखकर होणार आहे.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

नवीन वर्षात मेट्रो ३ लाइनचा पहिला टप्पा सुरु होणार

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम अंतिम टप्प्यात

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांचे मेट्रो ३ प्रोजेक्ट सुरु होणार आहे. पुणे मेट्रो लाइन ३ हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार आहे. पुढील तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात पुणेकरांना खुशखबर मिळू शकते.

चार नवीन पार्किंग

पुणे महापालिकेतर्फे मेट्रो प्रवाशांसाठी बाणेर बालेवाडीत चार पार्किंग देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपली वाहने पार्क करता येणार आहे. यामुळे मेट्रोने त्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे.

बाणेर, बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका चार पार्किंग उभारणार असू, त्यानंतर ते पीएमआरडीएच्या मेट्रोकडे हस्तांतरित करणार आहे. हिंजवडी- शिवाजीनगर या मेट्रोचा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आहे. दोन ते तीन महिन्यात हिंजवडी ते बाणेर मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरु आहे.त्यानंतर वर्षभरात हा संपूर्ण मार्ग सुरू होणार आहे.

हिंजवडीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा

बाणेर, बालेवाडी या भागातून हिंजवडी आयटी पार्क मध्य नोकरीला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच हिंजवडीच्या रस्त्यावर खूप जास्त वाहतूक कोंडी होती. कर्मचाऱ्यांना तासनतास एकाच जागेवर थांबावे लागते.यामुळे ऑफिसला पोहचायला उशिर होतो. याचसोबत हिंजवडीच्या रस्त्याची खूप जास्त दुरावस्था आहे. यामुळे मेट्रो लाइन ३ हा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या मेट्रो लाइनला प्रवासी चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.

दिवाळीत पुणे मेट्रोला फटका

दिवाळीत पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी संख्या घटली आहे. आधी लाखो लोक प्रवास करायचे आता ही संख्या काही हजारांवर आली आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी फक्त ५२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. दिवाळीत पुण्यात राहणारे कर्मचारी आपापल्या गावी गेले होते. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. आधी २ लाख ३६ हजार प्रवासी दररोज प्रवास करायचे आता ही संख्या सरासरी १२ हजारांवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: कार्तिक शुक्ल अष्टमीचा शुभ संगम; या राशींसाठी धार्मिक कार्य, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक लाभाचे संकेत

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

SCROLL FOR NEXT