

पुण्यात मेट्रोचं जाळ पसरत आहे. मेट्रोमुळे प्रवास खूप सोपा झाला आहे. आता पुणे मेट्रो लाइन २ वनाज ते रामवाडी लवकरच सुरु होणार आहे. पुणे मेट्रोमुळे वाहतूक कोडींपासून सुटका मिळणार आहे. दरम्यान, आता पुणे मेट्रो आता चांदणी चौक मेट्रो स्टेशनजवळ हा फूट वेअर ब्रिज बांधणार आहे. हा पूल ५८० मीटर लांबीचा असणार आहे.या ओव्हरब्रीजमुळे वाहतूक कोडींपासून सुटका होणार आहे.
बंगळुरु मुंबई बायपासवरील चांदणी चौकावर नेहमीच वर्दळ असते. इथे अनेक मार्गावरुन येणारे प्रवासी पुण्यात जातात. तसेच पुण्याबाहेर जाण्यासाठीही याच चांदणी चौकावरील बायपासचा वापर करतात. त्यामुळेच आता हा ओव्हरब्रीज बांधण्यात येणार आहे.
मेट्रो लाइन २ मध्ये वनाझ ते चांदणी चौक हा मार्ग १,१२३ मीटरपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामध्ये कोथरुड डेपो आणि चांदणी चौक ही स्थानके आहेत. आता चांदणी चौकातून राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना सहज प्रवास करता यावा, यासाठी हा ओव्हरब्रीज बांधण्यात येणार आहे.
हा मेट्रो फूटओव्हर ब्रिज चांदणी चौक येथील राष्ट्रीय महामार्गावरील (NHAI) च्या फूटओव्हर ब्रिजशी जोडला जाईल. जेणेकरुन नागरिकांना थेट राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करता येईल. आता नागरिकांना मेट्रोच्या विरुद्ध बाजून रस्ता ओलांडता येईल. त्याचसोबत चांदणी चौक मेट्रो स्टेशनवर पोहचण्यासाठी हा फुटओव्हर ब्रिज वापरता येईल.
पुणे मेट्रो वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी हा फुट वेअर ब्रिज तयार करत आहे. याचसोबत कर्वे रोडवरील आणि कोथरुड डेपोमध्ये डबल डेकर पूल बांधण्यासाठीही सुरुवात करण्यात आली आहे. कोथरुड डेपो आणि चांदणी चौक यादरम्यान अजून दोन स्थानके आहेत. सरकारने वनाझ ते चांदणी चौक हा मार्ग वाढवण्यास परवानगी दिली होती. यानंतर मात्र, चांदणी चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होईल, असं लक्षात आलं. त्यामुळेच नागरिकांसाठी हा ५०८ मीटर लांबीचा फूट ओव्हरब्रिज बांधण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.