पुणे मेट्रो लाईन ३ चाचणी बाणेरपर्यंत वाढवण्यात येणार
मे २०२६ पर्यंत हिंजवडी-शिवाजीनगर मार्ग पूर्ण कार्यान्वित होणार
या प्रकल्पात पीएमआरडीए, टाटा ग्रुप आणि सीमेन्स यांची संयुक्त भागीदारी
प्रकल्पामुळे आयटी हबसाठी जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो लाईन ३ (हिंजवडी-शिवाजीनगर)ची चाचणी बाणेर पर्यंत वाढविण्यात येणार आहे. शहराच्या मेट्रो विस्तारातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या, मान डेपो आणि बालेवाडी स्टेशन दरम्यान चाचणी ऑपरेशन्स सुरू आहेत. मे २०२६ मध्ये ही लाईन कार्यान्वित झाल्यानंतर, पुणे मेट्रोमध्ये प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी हिंजवडी येथून पहिल्यांदाच मेट्रो सुरू झाली. त्यादिवशी या प्रकल्पाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. मान डेपो ते बालेवाडी स्टेडियम येथील स्टेशन क्रमांक १० पर्यंतच्या पहिल्या चाचणीने प्रकल्पाची प्रगती दर्शविली आणि शहराच्या वाढत्या लोकसंख्येला एक नव्याने सुखकर प्रवासाचा मार्ग मिळाला.
पुणे मेट्रो लाईन ३ हा सुमारे २३ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे जो हिंजवडी या आयटी हबला शिवाजीनगर येथील मध्यवर्ती जोडतो. ही लाईन सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत विकसित केली जात आहे. ज्यामध्ये पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएमआरडीए) ने टाटा ग्रुपच्या टीआरआयएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (टीयूटीपीएल) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स जीएमबीएच यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला दिली आहे.
हा प्रकल्प पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) या विशेष उद्देश वाहनामार्फत डिझाइन, बांधणी, वित्तपुरवठा, ऑपरेट आणि हस्तांतरण (DBFOT) तत्त्वावर राबविला जात आहे. प्रकल्पासाठी सवलतीचा कालावधी बांधकाम टप्प्यासह 35 वर्षांचा आहे.
पुणे मेट्रो लाईन ३ सुरु झाल्यानंतर पुण्यातील आयटी व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवाशांना जलद, विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतुकीचे साधन मिळेल अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे शहरातील सर्वात वर्दळीच्या कॉरिडॉरपैकी एक असलेल्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.