Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ

Pune Khadakwasla NDA News : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत १८ वर्षीय कॅडेट आदित्य यादवचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ
Pune NDA NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील एनडीएत जलतरण सरावादरम्यान १८ वर्षीय कॅडेटचा मृत्यू

  • प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव सुरू असताना अचानक बेशुद्ध पडला

  • रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले

  • पोलिस तपास सुरु आहे

पुण्यातून धक्कदायक घटना समोर आली आहे. शहरातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधील एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव कॅडेट आदित्य डी. यादव आहे. या विद्यार्थ्याचा मृत्यू जलतरण सरावादरम्यान झाल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याच महिन्यात काही दिवसांपूर्वी या अकादमी मधील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता, कमकुवत जलतरणपटूंसाठी आयोजित जलतरण सरावादरम्यान हा प्रकार घडला. प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली प्रशिक्षणार्थी तलावाच्या रुंदीवर पोहत होते. त्या दरम्यान कॅडेट आदित्य डी. यादव पाण्याच्या पृष्ठभागावर अचानक बेशुद्ध अवस्थेत दिसून आला.

Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ
Maharashtra Rain Alert : दिवाळी संपली तरी पाऊस जाईना, पुढचे २ दिवस महत्वाचे; मुंबईसह २६ जिल्ह्यांना झोडपून काढणार

प्रशिक्षकांना संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पहिले आणि लाईफगार्डच्या तत्काळ मदतीने पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. आदित्यला त्वरित सीपीआर आणि प्राथमिक वैद्यकीय उपचार दिले गेले. तसेच पुढील उपचारासाठी एम.एच. खडकवासला येथे हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आदित्यच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आले असून चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.

Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ
EPFO 5 Rule News : आता पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, EPFO चे हे ५ नवे नियम माहिती आहेत का ?

या घटनेने अकादमीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याच महिन्यात एनडीए मधील १८ वर्षांच्या अंतरीक्ष कुमार सिंह याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याने आत्महत्या का केली ? याच कारण अद्यापही समोर आलं नसून काही दिवसांच्या फरकाने झालेल्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आदित्यचा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com