पुण्याला लवकरच महापौर मिळणार आहे
पुणे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव
पुण्याला मिळणार १० वी महिला महापौर
३०–३१ जानेवारी रोजी नावाची अधिकृत घोषणा होणार
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष प्रतिष्ठेच्या महापौरपदाकडे लागले होते. महापौरपदासाठी गुरूवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. पुणे शहराच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिला असं पडलं आहे. त्यामुळे आता पुण्यात महापौरपदाचा मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष राहिलं आहे. पुण्याला लवकरच १० व्या महिला महापौर मिळतील. ३० किंवा ३१ जानेवारी रोजी पुण्याला महापौर मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे मानसी देशपांडे, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे यांच्यासह इतर महिला नगरसेवकांची महापौर होण्याची संधी वाढली आहे. महापालिकेतील १६५ जागांपैकी तब्बल ११९ जागांवर भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मदतीने एकहाती सत्ता मिळविली.
गेली चार वर्षे प्रशासकाच्या हाती असलेला कारभार आता पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती येणार आहे. यंदा महापालिकेच्या सभागृहात सर्व पक्षीय विचार केला तर एकूण ६७ महिला नगरसेविका उपस्थितीत असणार आहेत. यामधील एक नगरसेविका पुण्याची महापौर होणार आहे. आता महापौरपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान कुणाला मिळतोय हे पाहणं महत्वाचे ठरेल.
२२ जानेवारी: महापौर पदाचे आरक्षण
२३ जानेवारी: नगरसचिवांनी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याकरिता निर्वाचित सदस्यांची बैठक बोलवण्यासाठी तारीख आणि वेळ निश्चितीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार
२४, २५ जानेवारी: विभागीय आयुक्त यांनी महापालिकेच्या प्रथम सभेची तारीख आणि पीठासन अधिकारी निश्चित करणार
२७, २८ जानेवारी: महापौर, उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्य नामनिर्देश पत्र महापालिका सचिवांना केलं जाणार सदर
३०, ३१ जानेवारी: महापौर व उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात येणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.