Pune Mayor Race: पुण्यात 10 व्या महिला महापौर कोण होणार? कोण बसणार खुर्चीवर? ही नावं चर्चेत

Pune Mayor Reservation 2026: पुणे महानगर पालिकेला लवकरच महापौर मिळणार आहे. पुणे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महापौर पदाच्या शर्यतीमध्ये अनेक महिला नगरसेविकांचा समावेश आहे.
Pune Mayor Race: पुण्यात 10 व्या महिला महापौर कोण होणार? कोण बसणार खुर्चीवर?  ही नावं चर्चेत
Pune Mayor Reservation 2026Saam Tv
Published On

Summary -

  • पुणे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

  • भाजपच्या अनेक महिला नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीत

  • 119 जागांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत

  • पुण्याला लवकरच 10 वी महिला महापौर मिळणार

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आज सर्वांचे लक्ष प्रतिष्ठेच्या महापौरपदाकडे लागले होते. या महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता ही प्रक्रिया मुंबईत पार पडली. मुंबई महापालिकेचा महापौर हा खुल्या प्रवर्गातील असेल तर पुणे शहराचा महापौर पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिला असं पडलं आहे. त्यामुळे आता पुण्यात महापौरपदाचा मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महापौर पद महिलांसाठी राखीव झाल्याने भाजपच्या अनेक जणांचे महापौर होण्याचे स्वप्न अर्धवट राहणार आहे हे नक्की.

पुण्याचे महापौर पद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाल्याने मानसी देशपांडे, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे यांच्यासह इतर महिला नगरसेवकांची महापौर होण्याची संधी वाढली आहे. महापालिकेतील १६५ जागांपैकी तब्बल ११९ जागांवर भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) मदतीने एकहाती सत्ता मिळविली आहे. गेली चार वर्षे प्रशासकाच्या हाती असलेला कारभार आता पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती येणार आहे. यंदा महापालिकेच्या सभागृहात सर्व पक्षीय विचार केला तर ६७ महिला नगरसेविका उपस्थितीत असणार आहेत.

Pune Mayor Race: पुण्यात 10 व्या महिला महापौर कोण होणार? कोण बसणार खुर्चीवर?  ही नावं चर्चेत
Akola Mayor: अकोल्याचा महापौर कोण होणार? भाजप की ठाकरेसेना? कोण बसणार खुर्चीवर?

नव्याने आलेल्या महिला नगरसेविकांना मिळणार संधी

९ वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले २.५ वर्ष कसबा आणि त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघाला महापौरपद मिळाले होते. दुसऱ्या बाजूला, पर्वती, कसबा या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेतेपदी संधी मिळाली होती. त्यामुळे यंदा वडगाव शेरी, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाला संधी देऊन अनपेक्षित असे महिला उमेदवाराचे नाव पुढे येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवाय, भाजप मधील अगदी पहिल्यांदा निवडून आलेल्यांचीदेखील लॉटरी लागू शकते, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे.

Pune Mayor Race: पुण्यात 10 व्या महिला महापौर कोण होणार? कोण बसणार खुर्चीवर?  ही नावं चर्चेत
Jalgaon Mayor : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महिलाराज, ४ महिलांचं नाव चर्चेत; वाचा संपूर्ण

९ महिलांनी आत्तापर्यंत बजावले पुण्याचे महापौर पद

पुणे महापालिकेत महापौर पदासाठी महिलांना संधी मिळण्याची ही पहिली वेळ नसून आत्तापर्यंत १० महिलांनी हे पद भूषवलं आहे. १९९५ ते १९९६ या दरम्यान पुण्याच्या पहिला महिला महापौर या पदाचा मान मिळाला तो म्हणजे काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांना त्यानंतर तात्काळ पुढील वर्षात काँग्रेस कडून वंदना चव्हाण यांना हे पद भूषवण्याचा मान मिळाला. १९९८-९९ मध्ये काँग्रेस ने पुन्हा या पदाची जबाबदारी वत्सला आंदेकर यांना मिळाली. त्यानंतर ३ वर्षांनी काँग्रेस ने दीप्ती चौधरी यांना २००२ ते २००५ पर्यंत महापौर केलं तर २००५ ते २००७ पर्यंत रजनी त्रिभुवन आणि पुढे २००९ पर्यंत राजलक्ष्मी भोसले या पुण्याचा महापौर राहिल्या.

२०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता पुणे महापालिकेवर आली असता वैशाली बनकर तर २०१३ ते २०१४ पर्यंत चंचला कोद्रे यांनी हे पद भूषवलं. २०१७ मध्ये भाजप ने पालिकेवर झेंडा फडकवला आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी महापौर पद भूषवलं.

Pune Mayor Race: पुण्यात 10 व्या महिला महापौर कोण होणार? कोण बसणार खुर्चीवर?  ही नावं चर्चेत
Women Mayors: राज्यातील १५ महापालिकांवर 'महिलाराज', कुठे कोण महापौर होणार? वाचा लिस्ट

"या" महिला नगरसेविकांची नावे आघाडीवर

पुण्यात महिला महापौर होणार असल्यामुळे सध्या प्रभागातील अनेक महिला उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये सलग तीन वेळ पुणे महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकाची भूमिका मांडणाऱ्या वर्षा तापकीर यांचं नाव आघाडीवर आहे. तापकीर यांनी पुण्यातील प्रभाग ३७ मधून निवडणूक लढवत पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवला. पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ३५ मधून मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवडणूक झाली आणि महापौर पदाच्या रेस मध्ये त्यांनी त्यांच्या नावाची जागा आघाडीवर आणली आहे.

Pune Mayor Race: पुण्यात 10 व्या महिला महापौर कोण होणार? कोण बसणार खुर्चीवर?  ही नावं चर्चेत
Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

या यादीत आणखी एका नावाची जोरदार चर्चा आहे ते नाव म्हणजे स्वरदा बापट यांचं. माजी खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांनी प्रभाग २५ मधून घवघवीत यश मिळवत मूळ पुणेकरांचा कौल त्यांच्याकडे वळवला. भाजप च्या मानसी देशपांडे या आमदार आणि मंत्री माधुरी मिसाळ यांच्या निकटवर्तीय आहेत. प्रभाग २० मधून मानसी देशपांडे यांनी सलग चौथ्यांदा महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा महापौर पदाच्या रेस मध्ये आघाडीवर आहे. या यादीत निवेदिता एकबोटे, ऐश्वर्या पठारे आणि वीणा घोष यांचा नावाची सुद्धा चर्चा आहे.

पुणे शहरात भाजप मधून महापौरपदासाठी अनेक महिलांची नाव चर्चेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य रत्नमाला सातव यांनी घेतला आहे. रत्नमाला सातव यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. एकतीस हजार 136 एवढ्या मताने त्या विजयी झाल्या आहेत त्या पुणे शहरात सर्वाधिक मतं 41560 त्यांना पडले आहेत. वाघोलीमधून त्या विजयी झाल्याने त्यांचं नाव सध्या चर्चेत येत आहे.

Pune Mayor Race: पुण्यात 10 व्या महिला महापौर कोण होणार? कोण बसणार खुर्चीवर?  ही नावं चर्चेत
Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com