Maval Kasarsai Dam Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Maval Breaking News: कॉलेज बुडवून फिरायला गेला, सहलीचा आनंद क्षणात मावळला, कासारसाई धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Maval Latest News: मावळच्या कासरसाई धरणात बुडून थेरगाव येथील एम एम कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कॉलेजला सुट्टी टाकून थेरगाव येथील एमएम शाळेचे पाच विद्यार्थी कासारसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते.

दिलीप कांबळे

मावळ, ता. २० जुलै २०२४

राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करत असून अनेक मोठ्या दुर्घटनाही घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना मावळमधून समोर आली आहे. मावळच्या कासरसाई धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समो आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मावळच्या कासरसाई धरणात बुडून थेरगाव येथील एम एम कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सारंग रामचंद्र डोळसे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. कॉलेजला सुट्टी टाकून थेरगाव येथील एमएम शाळेचे पाच विद्यार्थी कासारसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते.

धरण बघत असताना पाण्यात उतरून खेळण्याचा मोह सारंगला आवरला नाही. पाण्यात उतरुन खेळत असताना पाण्याच्या खोलीचा त्याला अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात वाहून गेला. बाकीच्या मित्रांनी आरडा ओरडा केल्यानंतर गावातील नागरिकांनी परंडवाडी पोलिसांना फोन केला. क्षणाचाही विलंब न करता परंडवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आजूबाजूला तपासणी केल्यानंतर पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला प्रचार केले. शिवदुर्ग टीमने काही वेळातच मृतदेह बाहेर काढला. पुढील तपासणीसाठी त्याला पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अधिक तपास परंडवाडी पोलीस करीत आहेत. फिरायला गेलेल्या विद्यार्थ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT