VIDEO: 'लोकसभेला राष्ट्रवादीचं काम केलं ते सर्व आमचे', अतुल बेनकेंची भेट अन् शरद पवारांचे एक वाक्य; दादांचं टेन्शन वाढलं!

Maharashtra Politics Sharad Pawar Vs Ajit Pawar News: अहमदनगर जिल्ह्याचा दौरा संपल्यानंतर आज शरद पवार शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौ-यावर असुन आज सकाळी खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी जुन्नर तालुक्याचा आढावा घेत आहेत.
VIDEO: 'लोकसभेला राष्ट्रवादीचं काम केलं ते सर्व आमचे', अतुल बेनकेंची भेट अन् शरद पवारांचे एक वाक्य; दादांची धाकधुक वाढली!
Maharashtra Politics Sharad Pawar Vs Ajit Pawar News: Saam Digital
Published On

जुन्नर, ता. २० जुलै २०२४

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. काल अहमदनगरमध्ये सभा झाल्यानंतर शरद पवार आता जुन्नरमध्ये गाठीभेठी घेत आहेत. यावेळी सध्या अजित पवार गटात असलेले आमदार अतुल बेनके यांची शरद पवार यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचा दौरा संपल्यानंतर आज शरद पवार शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौ-यावर असुन आज सकाळी खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी जुन्नर तालुक्याचा आढावा घेत आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर आंबेगाव आणि खेड आळंदी या तीन मतदार संघात शरद पवारांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत संवाद साधणार आहेत. काल रात्री उशिरा शरद पवार हे अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी मुक्कामी होती.

यावेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळं आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. खासदार अमोल कोल्हेच्या घरी ही भेट घडली, याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे.

VIDEO: 'लोकसभेला राष्ट्रवादीचं काम केलं ते सर्व आमचे', अतुल बेनकेंची भेट अन् शरद पवारांचे एक वाक्य; दादांची धाकधुक वाढली!
Pune News: पालकांनो खबरदार! अल्पवयीन मुलाकडे गाडी द्याल तर थेट वाहन जप्त, लायसन्सही मिळणार नाही; वाहतूक प्रशासनाचा मोठा निर्णय

काय म्हणाले शरद पवार?

"ते आत्ता कोणत्या पक्षात आहेत? मला ते अजित पवार गटात आहेत, याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळं यावर फार चर्चा नको. असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच केले.

तसेच कालच्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी, असे सर्वात मोठे अन् सूचक वक्तव्यही पवार यांनी केले. त्यामुळे दादांच्या आमदारांनी लोकसभेला शरद पवारांच्या उमेदवारांचे काम केले का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

VIDEO: 'लोकसभेला राष्ट्रवादीचं काम केलं ते सर्व आमचे', अतुल बेनकेंची भेट अन् शरद पवारांचे एक वाक्य; दादांची धाकधुक वाढली!
Manoj Soni Resign: UPSC चेअरमन मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा; पूजा खेडकर प्रकरणामुळं घटनेला महत्त्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com