Manoj Soni Resign: UPSC चेअरमन मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा; पूजा खेडकर प्रकरणामुळं घटनेला महत्त्व

UPSC Chairperson Manoj Soni Resign: मनोज सोनी यांनी गेल्याचवर्षी पदभार स्विकारला होता. त्यामुळे कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने चर्चा रंगल्या आहेत.
Manoj Soni Resign: ब्रेकिंग! युपीएससीच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; कार्यकाळ संपण्याआधीच मोठा निर्णय
Manoj Soni Resign:Saamtv
Published On

दिल्ली, ता. २० जुलै २०२४

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांनी गेल्याचवर्षी पदभार स्विकारला होता. त्यामुळे कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने चर्चा रंगल्या आहेत. वैयक्तिक कारणांमुळे सोनी यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

Manoj Soni Resign: ब्रेकिंग! युपीएससीच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; कार्यकाळ संपण्याआधीच मोठा निर्णय
Ahmednagar Politics : नगरमध्ये कोल्ड वॉर; विखेंकडून लंकेच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, 1991ची पुनरावृत्ती होणार का?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला असून अद्याप तो स्विकारला नसल्याची माहिती आहे. मात्र सोनी यांच्या कार्यकाळाला अद्याप ५ वर्ष शिल्लक असताना त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने चर्चा रंगल्या आहेत.

डॉक्टर सोनी हे २०१७ मध्ये लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले होते तर २०२३ मध्ये त्यांनी युपीएससी बोर्डाचे अध्यक्षपद स्विकारले होते. अशातच त्यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

Manoj Soni Resign: ब्रेकिंग! युपीएससीच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; कार्यकाळ संपण्याआधीच मोठा निर्णय
Chhatrapati Sambhajinagar Crime: खळबळजनक! वाळुज MIDC परिसरात गोळ्या झाडून तरुणाची हत्या; छत्रपती संभाजीनगर हादरलं

दरम्यान, देशभरात सध्या पूजा खेडकर प्रकरण गाजत आहे. पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त प्रकरणामुळे लोकसेवा आयोगातील परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच अध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आलं आहे.

यावरही सोनी यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी या पदावरून पायउतार होत आहे. प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) वरील वाद आणि आरोपांशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Manoj Soni Resign: ब्रेकिंग! युपीएससीच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; कार्यकाळ संपण्याआधीच मोठा निर्णय
Heavy Rain Alert : महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून ९ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com