Ahmednagar Politics : नगरमध्ये कोल्ड वॉर; विखेंकडून लंकेच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, 1991ची पुनरावृत्ती होणार का?

Ahmednagar Politics News : नगरमध्ये नीलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात कोल्ड वॉर झालं आहे. विखेंनी नीलेश लंकेच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान दिलं आहे.
नगरमध्ये कोल्ड वॉर; विखेंकडून लंकेच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, 1991ची पुनरावृत्ती होणार का?
Sujay Vikhe vs Nilesh LankeSaam TV
Published On

अहमदनगर :

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके जिंकून येऊनही राजकारण तापलेलं आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेल्या नीलेश लंके यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका महायुतीचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी याचिकेतून केली आहे.

नगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अॅड. आश्विन होन यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या दाखल केलेल्या याचिकेत काही मतदान केंद्रावरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आला आहे. ४० ते ४५ केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने झाली नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या मतदान केंद्रावरील मतदानाची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रीतसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केली आहे.

नगरमध्ये कोल्ड वॉर; विखेंकडून लंकेच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, 1991ची पुनरावृत्ती होणार का?
NCP Politics: 'नगर आणि माढा'वरून जुंपली! निलेश लंके यांचा अजित पवारांवर पलटवार; म्हणाले, 'शिळ्या कढीला ऊत...' VIDEO

याचिकेत काय म्हटलंय?

निवडणुकीच्या प्रचारात लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे ही खोटी आणि बदनामी करणारी आहेत. नीलेश लंके यांनी निवडणुकीत दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवला नाही. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत.

नीलेश लंकेंनी दाखविलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही. लंके यांनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातील मर्यादेचे उल्लंघन केलंय, असा आरोप करत डॉ. सुजय विखे पाटाली यांनी याचिका दाखल केली आहे. पुढे खंडपीठानेही याचिका दाखल करून घेतली आहे.

नगरमध्ये कोल्ड वॉर; विखेंकडून लंकेच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, 1991ची पुनरावृत्ती होणार का?
Nilesh Lanke On Ajit Pawar: निलेश लंके यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पलटवार!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मॅक पोलसाठी 40 लाख रुपये शुल्क भरले होते. विखे यांनी 40 मतदान केंद्रावर मॅक पोल करण्याची मागणी केली होती. निकालाच्या ४५ दिवसांनी आता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निश्चित काहीतरी मोठे घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या याचिकेमुळे पुन्हा एकदा 1991 सालची पुनरावृत्ती होते का काय अशी चर्चा सुरू झाली आहे. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्या निवडणुकीची पुनरावृत्ती 2024 मध्ये होणार का? याकडे आता सर्वांची लक्ष आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com