Pune Zilla Parishad Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Zilla Parishad School: पुणे जिल्ह्यातल्या १६ शाळा अनधिकृत, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Pune Unauthorized School: या अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

Priya More

Pune News: पुणे जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत (Pune Unauthorized School) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह. राज्यातील अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करण्याच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) शिक्षण विभागाला (Education Department) सर्वेक्षण करताना ही बाब आढळून आली आहे. या शाळांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यातील दोन शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनधिकृत शाळाविरोधात कारवाई करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. या आदेशानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यामध्ये तब्बल १६ अनधिकृत असल्याची माहिती समोर आली. या शाळांपैकी दोन शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील आठ शाळांकडून जवळपास ४४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तो दंड सरकार जमा करण्यात आलाय.

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विविध शाळांच्या तपासणी केल्या गेल्या होत्या. त्या तपासणीत ५३ शाळा या अनधिकृत म्हणून आढळल्या. त्या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या शाळांना नोटीस पाठवून त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. ५३ पैकी ३७ शाळा अनधिकृत आढळल्याने त्या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र त्या शाळांनी राज्य सरकारकडून शाळा सुरू ठेवण्याचे परवानगी मिळवली. त्यामुळे त्यातील १६ शाळांवर पुन्हा कारवाई सुरू केली.

शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात १६ शाळा अनधिकृत आढळल्या आहेत. या सर्व शाळा मुळशी, दौंड, पुरंदर, खेड तालुक्यातील असून मुळशी तालुक्यातील सर्वाधिक शाळांचा यात समावेश आहे. त्यातील ८ शाळा अनधिकृत असल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४४ लाख रुपये दंड वसूल केला आहे. शिवाय उर्वरित शाळांकडून समाधानकारक खुलासे न आल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजपकडून अरविंद केजरीवाल यांची बदनामी - संजय राऊत

7 Days Glowing Skin Challenge: ग्लोईंग स्किनसाठी फक्त 7 दिवस चेहऱ्यावर करा 5 सोपे उपाय

Viral flight video: विन्डो सीट बुक केली पण विमानातून सीटच गायब; तरूणीने सोशल मिडीयावर शेअर केला विचित्र अनुभव

Gold Price Today: होळीआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळ्यामागे ३१,६०० रुपयांची वाढ, २२-२४ कॅरेटचे आजचे दर किती?

Famous Actress : "हिरोच त्याच्या चित्रपटाची हिरोईन निवडतो..."; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितलं बॉलिवूडमधलं सत्य

SCROLL FOR NEXT