17 year old girl dies of snake bite Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News : १७ वर्षीय प्रांजलचा सर्पदंशाने मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप; आई-बापाचा टाहो

Pune Girl Dies of Snakebite in Rajguru Nagar : पुण्यातील राजगुरुनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे १७ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील आडगावमध्ये ही घटना घडली आहे.

Prashant Patil

रोहिदास गाडगे, साम टिव्ही

पुणे : पुण्यातील राजगुरुनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे १७ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील आडगावमध्ये ही घटना घडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार उपलब्ध न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. प्रांजल तुकाराम गोपाळे असं १७ वर्षीय मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल तुकाराम गोपाळे (वय १७, रा. आडगाव, ता. खेड, जि. पुणे) हिला सकाळी नऊच्या दरम्यान सर्पदंश झाला. तिला प्राथमिक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाईट येथे आणले असता दवाखान्यात सर्पदंशाची लस तसेच डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारासाठी चांडोली रुग्णालय येथे देण्यात आलं. त्याठिकाणी देखील लस उपलब्ध नसल्यानं प्राथमिक उपचार करून १०८ रुग्णवाहिकेत प्रांजल हिला पुढील उपचाराकामी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवत असताना रुग्णवाहिकेत कोणताही हॉस्पिटलचा स्टाफ सोबत नव्हता. तसेच इतर रुग्णांमध्ये या रुग्णाला देखील नेण्यात आलं. मात्र, प्रांजल हिचा चिखली येथे रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत प्रांजलच्या कुटुंबीयांशी चर्चा केली असता त्यांनी वरील संपूर्ण माहिती दिली. याबाबत आरोग्य विभागाचे विलास माने (THO) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाचे नातेवाईक चुकीचे व खोटे आरोप करत आहेत अशी प्रतिक्रिया फोनद्वारे दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT