शिवरायांनी जसा अफजलखानाचा कोथळा काढला, तसा PM मोदी पाकिस्तानचा कोथळा काढणार - रामदास आठवले

Ramdas Athawale : लोणावळ्यात एका कार्यक्रमासाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आठवले यांनी भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य केले.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleX
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पाकिस्तानचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. रामदास आठवले लोणावळ्यात बोलत होते.

'शिवरायांना आणि भिमरायांना वंदन करुनच आम्ही पुढे जात असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच प्रकारे नरेंद्र मोदी सुद्धा पाकिस्तानचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. पाकडे आमचं काय करणार वाकडे...' असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे.

Ramdas Athawale
Beed Crime : तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू...! बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, परळीत मारहाण झालेल्या तरुणाने सांगितली आपबिती

'पाकिस्तानने पुन्हा-पुन्हा भारतावर हल्ला करायचा, पुन्हा-पुन्हा दहशतवाद्यांना पाठवून आमच्यावर हल्ला करायचा.. यात कुठली मर्दानगी आहे. या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे जाऊन आमच्या भारतीय पर्यटकांवर गोळ्या घातल्या. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि भारत पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही' असे आठवले यांनी म्हटले.

Ramdas Athawale
BMW आणि ५ कोटी, बायकोने मागितला हुंडा, वायुसेना महिला अधिकाऱ्याच्या विरोधात नवरा कोर्टात

लोणावळ्यात बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी रामदास आठवले यांची खास उपस्थिती होती. मावळचे आमदार सुनील शेळके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते. रामदास आठवलेंच्या हस्ते बुद्ध विहाराचा सोहळा संपन्न झाला.

Ramdas Athawale
Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण, हादरवणारा व्हिडीओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com