Pune Rain update  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Pune Rain update : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. पुण्यातील पावसाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

पुण्यात २ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय

बाणेर ते विद्यापीठ चौक रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प

आंबेगाव, कात्रज, कोथरुडसारख्या परिसरात वाहनं अडकली पाण्यात

रांजणगाव गणपतीजवळील महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

पुणे : पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. पुणे शहरातील विविध भागातील रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतंय. पुण्यात गेल्या २ तासांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे बाणेरकडून औंध, विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पुण्यात कोसळणाऱ्या बाणेर औंध रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. तर मुसळधार पावसामुळे बाणेरमधील रस्त्यांवरही पाणीच पाणी जमा झालं आहे. अचानक रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांचे अतोनात हाल झाले आहेत.

पुण्यातील आंबेगाव कात्रज परिसरातही जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसाने रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं. अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनं बंद पडत आहेत. या पावसामुळे बाणेर ते विद्यापीठ रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुणे शहरातील चांदणी चौक ते कोथरुड रस्ता उतारावरील परिस्थिती पुष्पक हॅाटेलसमोर आलं.

रांजणगाव गणपतीजवळ रस्त्यावर पाणीच पाणी

अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपतीजवळ हायवे रोडवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनचालकांना रेंगाळत वाहतूक करावी लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका देखील वाढलाय. यामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाला तातडीने पाणी उपसून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांनी निवडणुकीत पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

पाकिस्तानची जिरवली; सीमेवरील चकमकीत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार, तालिबानचा दावा

खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, ५ महिलांवर कोयता अन् कुऱ्हाडीनं वार; नेमकं कारण काय?

Amravati : सोयाबीन काढणी करताना घडले दुर्दैवी; मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update : वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन

SCROLL FOR NEXT