Laxman Hake : आमच्या ४ पिढ्या घाबरल्या, पण आता बोलणार, आंदोलन करणार; लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

Laxman Hake News : लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलकांच्या टीकेचा समाचार घेतला. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Laxman Hake news update
Laxman Hake News Saam tv
Published On
Summary

लक्ष्मण हाके यांचं लग्नावरील विधानावर मराठा समाजाचा विरोध

हाके यांनी टीकेला उपरोधिक प्रत्युत्तर दिलं

हाके यांनी OBC समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं

सामाजिक न्यायासाठी मोठं पिवळं वादळ उभं केलं जाईल, असा हाकेंनी इशारा दिला

योगेश काशिद, साम टीव्ही

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या लग्नावरील वक्तवाचा मराठा समाजाचा विरोध केला जात आहे. लग्नाच्या वक्तव्यावरून मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना ठोकून काढण्याचा इशारा दिला आहे. मराठा आंदोलकांच्या विधानावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या आतापर्यंत आमच्या ४ पिढ्या घाबरल्या. पण आता बोलणार आणि आंदोलन करणार आहोत, असं प्रत्युत्तर लक्ष्मण हाके यांनी दिलं.

लक्ष्मण हाके हे ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे करत आहेत. आज गुरुवारी लक्ष्मण हाके हे बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. हाके म्हणाले, ' मी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा एक विचार मांडला होता. मी कुठेही लग्न लावा, लग्न लावा किंवा लग्न लावायला गेलो नव्हतो. मी नुसतं बोललो तर एवढ्या इंगळ्या डसल्या'.

'या लोकांना सामाजिक मागासांचं आरक्षण पाहिजे. मागासपणाचे हार्डल्स एकही ऑर्डर्स पूर्ण न करता, आम्ही कसे 96 कुळी. आम्ही कसे क्षेत्रीय आहोत. आम्ही कसे मराठी जात वर्चस्वाची यांची भाषा. आता काय म्हणतायत ठोकून काढू. मी आता खूप घाबरलोय. मी काय आता उद्यापासून सभा काही देणार नाही. घोंगडं पांघरून घरात झोपतो. राजेंद्र कोंढरे यांच्या ठोकून काढूला मी एवढा घाबरलो, असे लक्ष्मण हाके उपरोधिकपणे म्हणाले.

'मी आता बीडमध्ये आहे. मी काल कळमनुरीमध्ये होतो. सकाळी नांदेडमध्ये होतो. आज माजलगावमधील मंजरथमध्ये सभा घेऊन आलो. उद्या केजमध्ये सभा घेतोय. संध्याकाळी गेवराईमध्ये आहे. कुणाला ठोकायचा आहे ना... या. तुमच्या ठोकायच्यामुळे आमच्या बाप दादाच्या चार पिढ्या घाबरल्या. आम्ही प्रतीकात्मक बोलणार. आम्ही आंदोलन करणार. आम्ही संविधानाला मानणारे माणस आहोत. आम्हाला काही कळत नाही, या भानगडीत कोणी पडायचे नाही, असे हाके म्हणाले.

Laxman Hake news update
Marutiच्या गाड्या लाखांनी स्वस्त होणार, S-Presso ते Wagon R कारच्या किंमतीत मोठी कपात, वाचा यादी

हैदराबाद गॅझेटशी संबंधित कोर्टाच्या एका निकालावर हाके म्हणाले, मी तो निकाल पाहिला नाही. तो निकाल पाहून बोलतो. मात्र आमच्या अनेक त्याचे का आहेत आणखी आणि हे आरक्षण बेकायदा आहे. सरकारने काढलेला हा जीआर रद्द केला नाही. तर आम्ही गावगाड्यातील ओबीसी आम्ही एकत्र येऊ. आता ओबीसींच्या पिवळ्या वादळाला, सामाजिक न्यायाच्या वादळाला येथील आमदार खासदारांना सामोरे जावे लागेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com