Pune Police x
मुंबई/पुणे

Pune : पोलीस ठाण्यात राडा! दारूच्या नशेत चालकाचा गोंधळ, पोलिसांना शिवीगाळ अन् मारहाण; फोन, लॅपटॉपही फोडले

Pune Police : पुण्यात मद्यधुंद अवस्थेतील वाहनचालकाने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. त्याने ठाण्यातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तेथील मालमत्तेचे नुकसानही केले.

Yash Shirke

  • चाकण वाहतूक कार्यालयात एका व्यक्तीने घुसून तोडफोड केली.

  • त्याने पोलिसांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिवीगाळ केली.

  • त्यासोबत लॅपटॉप, प्रिंटर अशा सरकारी मालमत्तेचे नुकसानही केले.

Pune Police News : पुण्यातील एका पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. मद्यधुंद अवस्थेतील एका वाहनचालकाने पोलीस ठाण्यात मोठा राडा केला. वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये घुसून चालकाने अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिवीगाळ केली. त्याने ऑफिसमध्ये तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी त्या चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे, वाहतूक पोलिसांशी वाद घालणे आणि पोलीस ठाण्यातील मालमत्तेची तोडफोड करणे या आरोपांखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव गणेश कवड (वय ४६, रा. नाशिक) असे आहे. त्याच्याविरोधात वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल दादासाहेब गायकवाड यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दारूच्या नशेत असलेला आरोपी हा वेगाने वाहन चालवत होता. रस्त्यावरील दुसऱ्या वाहनाला त्याने जोरदार धडक मारली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असूनही, स्वत:ची चूक असूनही त्याने दुसऱ्या वाहनचालकाकडून भरपाईची मागणी केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे वाढत गेला.

आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये घुसला. तेथील अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा त्याने प्रयत्न केला, त्यांना शिवीगाळ देखील केली. श्वास विश्लेषक चाचणी (Breath test) जी चालकाने मद्यपान केले आहे की नाही ते तपासण्यासाठी केली जाते, त्यात आरोपीने अडथळा आणला. त्यानंतर आरोपीने टेबलावर ठेवलेले दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि एक सरकारी प्रिंटर फोडले. यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

SCROLL FOR NEXT