Pune Saam
मुंबई/पुणे

Pune: कागदावर मोबाईलचा पासवर्ड अन् खोलीत गळफास घेत आयुष्य संपवलं; पुण्यात निवासी डॉक्टरानं उचललं टोकाचं पाऊल

Pune Doctor Tragic Death: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टर श्याम व्होरा (वय २८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर आणखी एका प्रकरणामुळे पुणे हादरलं आहे. निवासी डॉक्टरने खोलीतच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला असून, रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

श्याम व्होरा (वय २८) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हा युवा डॉक्टर पुणे शहरातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. रविवारी त्याने राहत असलेल्या डॉक्टर हॉस्टेलमध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. रविवारी (८ जून) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम बराच वेळ खोलीत होता. कुणीही दरवाजा उघडत नसल्यामुळे सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्यामुळे त्याने दरवाजा तोडला. त्यावेळी श्याम व्होरा हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी खोलीची झडती घेतली. पोलिसांना घटनास्थळी मोबाईलचा पासवर्ड लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून, चिठ्ठीच्या आधारे तपास सुरू आहे.

दरम्यान, डॉ. व्होरा हे मूळचे गुजरातमधील असून, त्यांच्या कुटुंबीयांनी पुण्यात आल्यानंतरच मृतदेहासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुळशीत घरात शिरला भला मोठा साप, आजीनं दाखवला धमाका

Joe Root : सचिन तेंडुलकरचा महाविक्रम धोक्यात, 'मास्टर ब्लास्टर'चा रेकॉर्ड इंग्लंडचा जो रूट मोडणार?

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?

Maharashtra Politics: राज्यात 100 कोटींचा घोटाळा? हेल्थ एटीएमची विनाटेंडर खरेदी?

Vijay Ghadge Health : मोठी बातमी! अजित पवारांची पुण्यात भेट, लातूरला परतताना अचानक विजय घाडगे यांची प्रकृती खालावली

SCROLL FOR NEXT