Breaking News

Politics: पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण फिरणार; ठाकरेंचा 'पैलवान' शिंदेंच्या आखाड्यात

Maharashtra Kesari: राजकारण आणि कुस्ती या दोन्ही मैदाने गाजवलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On: 

राजकारण आणि कुस्ती ही दोन्ही मैदाने गाजवलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी अखेर मशाल खाली ठेवत 'धनुष्यबाण' उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आज सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत. चंद्रहार पाटलांनी यासंदर्भात सोशल माध्यमांमध्ये पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. दरम्यान, ठाकरेंची साथ सोडल्यामुळे पाटील यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.

राज्यात मनसे-ठाकरे युतीची चर्चा सुरू असताना, सांगलीत मात्र उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले चंद्रहार पाटील यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेल राम राम ठोकत शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली आहे. त्यांनी ट्वीट करत हजारो कार्यकर्त्यांसह सोमवारी ठाण्यात पक्षप्रवेश करत असल्याचं स्पष्ट केलं.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Mumbai Local: १,२,३,४,५,६... मुंब्रा स्थानकावर मृतदेहाचा खच, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप

लोकसभा निवडणुकीत पराभव

लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतर बरोबर १ वर्षानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.

मंत्री संजय शिरसाठ यांचा सूचक इशारा

काही दिवसांपूर्वी संजय शिरसाठ यांनी सोमवारी चंद्रहार पाटलांचा पक्षप्रवेश होईल, हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असा सुचक इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला होता.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Local Accident: दोन लोकल एकमेकांना घासल्या, दारावर लटकलेल्या प्रवाशांची पाठ सोलली गेली अन् रूळावर पडले; ६ जणांचा मृत्यू

दरम्यान सांगलीच्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांकडून चंद्रहार पाटलांच्या नाराजी व्यक्त करत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रहार पाटलांनी जिल्ह्यातील शिवसेना वाढीसाठी योगदान दिलं नाही. त्यामुळे त्यांच्या असण्याने आणि नसल्याने काही फरक पडणार नाही आणि मैदान गाजवणारी माणसं शिवसेनेत आहेत. अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाकडुन टीका करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Transgender: लग्न केलं ८ महिने संसार थाटला, नंतर मुलगी निघाली ट्रान्सजेंडर; तरूणानं VIDEO शेअर करत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com