Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News: बायको सरपंच, डिजीटल अरेस्टची भीती दाखवत कोट्यवधीचा गंडा; इंजिनीअरला बेड्या, राजकीय नेत्याशी कनेक्शन

Pune Cyber Police: पुण्यातील एका ज्येष्ठ व्यक्तीला सायबर अरेस्टची भीती दाखवत ६ कोटींची गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी रायगडमधील तरुणाला अटक केली.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

देशात सायबर फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दररोज नवीन क्लुप्ती लढवून हे सायबर भामटे सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालतात. सर्वसाधारणपणे हे भामटे परराज्यातले किंवा परदेशातील असतात. मात्र पुण्यातील एका अशाच सायबर चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यामध्ये एका राजकीय पक्षाशी निगडित असणाऱ्या भामट्याला पुणे पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (२८ वर्षे) असं या सायबर भामट्याचे नाव आहे. तुषार रायगड जिल्ह्यातल्या रोहामधील कोकबन गावात राहतो. तुषार बांधकाम व्यवसायिक आहे. इतकंच नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या जवळचा आणि खास माणूस आहे. त्याचे फोटो एका बड्या नेत्यासोबत आहेत. त्याची पत्नी राष्ट्रवादीची कार्यकता असून ती गावची सरपंच देखील आहे.

तुषारने पुण्यासह देशातील अनेक नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती घालून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. मनी लॉड्रिंग व्यवहारात डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तुषारने ६ कोटी २९ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणात या सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून पुणे सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तुषार वाजंत्रीने फक्त हा एकच नाही तर डिजिटल अरेस्टची भीती दाखवून आणखी ५ जणांची फसवणूक केल्याचे तपासातून उघड झाले आहे. तुषारने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पोलिस असल्याची बतावणी केली. त्याने मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले.

१ ते १९ नोव्हेंबर दरम्यान फसवणूक झालेल्या जेष्ठ व्यक्तीने घाबरून तुषारच्या बँक खात्यात ६ कोटी २९ लाख रुपये जमा केले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांना ती रक्कम तुषारच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. सायबर चोरीतून मिळालेल्या पैशांपैकी त्याने त्यातील ९० लाख आणि २० लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवले होते.

ज्या खात्यात त्याने हे पैसे ठेवले होते ते बँकखाते कोकबन येथील धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहचले पण राजकीय संबंध असलेल्या तुषारला पोलिस आल्याची चाहूल लगेच लागली. पोलिस येत आहेत हे कळताच तो तिथून फरार झाला. तुषार पनवेलमध्ये असल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. सायबर चोरीच्या गुन्ह्यात केरळ पोलिसही तुषारचा शोध घेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT