
Delivery boy attacks youth: उल्हासनगर कॅम्प पाचमधील बसंत बहार परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका युवकावर बांबूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिक खान (वय अंदाजे २८) या युवकावर रफिक पार्सलवाले गटाच्या ५ ते ६ जणांनी लाकडी बांबूने मारहाण केली. या हल्ल्यात अतिकचा एक हात फ्रॅक्चर झाला असून दोन्ही पायांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिक खान काही दिवसांपूर्वी आपल्या गावी जाऊन परतला होता. तो बसंत बहार परिसरातील एका जीन्स दुकानात पार्सल बांधण्याचे काम करत होता. याचवेळी रफिक पार्सलवाल्याचे काही साथीदार तिथे आले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता अतिकवर हल्ला चढवला. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अतिकला तातडीने उल्हासनगरच्या(Ulhasnagar) मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अतिकला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिक खानने दिलेल्या माहितीनुसार, "मी गावात असताना देखील रफिक मला वारंवार धमक्या देत होता.
गावाहून परतल्यानंतर मला कामावर न आल्याचा राग ठेवून त्यांनी मला मारहाण (Fighting) केली." या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.