Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! हॉटेलमध्ये तरुणावर कोयत्याने सपासप वार, थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

Pune Police: पुण्यात कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. लोणी काळभोरमध्ये हॉटेलमध्ये जेवत बसलेल्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More
  • पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय

  • लोणी काळभोरमध्ये कोयता गँगकडून धुमाकूळ

  • हॉटेलमध्ये जेवत असताना तरुणावर हल्ला

  • दारूच्या पैशांवरून वाद घातल केला हल्ला

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँग सक्रीय झाली आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी यावेळी तरुणाच्या डोक्यात दारूच्या बाटल्या देखील फोडल्या. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कवडीपाट टोलनाका येथे सागर रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलमध्ये ही घटना घडली. कोयता गँगने या हॉटेलमध्ये राडा घातला. प्रसाद दिलीप शेंडगे हा तरुण जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेला होता. या हॉटेलमध्ये आलेल्या काही तरुणांनी प्रसादला जेवत असताना रोखले आणि आम्हाला दारू घेऊन दे नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. प्रसादने या तरुणांना दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला. तर आरोपींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

टोळक्यांनी प्रसाद शेंगडे या तरुणाला आधी दारूच्या बाटल्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. आरोपींनी हॉटेलमध्ये धुमाकूळ घातल्यामुळे त्याठिकाणी जेवणासाठी आलेले नागरिक देखील घाबरले. आरोपींनी कवडीपाट टोलनाका येथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मुख्य आरोपी राज रवींद्र पवार, प्रेम तान्हाजी गायकवाड, सौरभ सुनील गायकवाड आणि राहुल घाडगे यांच् विरोधात गुन्हा दाखल केला. मारहाण करणारे आरोपी अजूनही मोकाट आहेत. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून अटक; तिहार कारागृहात पाठवले जाणार?

Maharashtra News Live Update: कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केल्याप्रकरणी FDA चे 6 अधिकारी वादाच्या भोवऱ्यात

Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT