pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात दरोड्याचा थरार; कुख्यात टोळीची शहरात शस्त्रांसहित एन्ट्री, क्षणात पोलिसांनी डाव उधळला, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Crime News : पुण्यात दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Akshay Badve

पुण्यातील वारजे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका शिखलकऱ्याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेचा हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वारजे माळवाडी मधील म्हाडा कॉलनी आणि आसपासच्या परिसरात घरफोड्या करण्यासाठी तयारीत आलेल्या कुख्यात टोळीतील सदस्याला थरारकरित्या पकडण्यात वारजे पोलिसांना यश आलं आहे.

पहाटे साडेतीन वाजता वाजता पुण्यातील टाक गँगचे सदस्य जीप घेऊन धारदार शस्त्रांसह जबरी दरोडा आणि घरफोड्या करण्याच्या उद्देशाने वारजे परिसरात पोहचले. याबाबतची माहिती एका व्यक्तीनं पोलिसांना कळवली. वारजे पोलिसांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या तिघांपैकी एकाला वारजे पोलिसांनी पकडलं. सोनू कपूर सिंग टाक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून धारधार शस्त्र आणि काही मुद्देमाल मिळून आला आहे.

थराराचा संपूर्ण घटनाक्रम पहा

हा सगळा प्रकार आज पहाटे ३.५५ वाजता पुण्यातील वारजे परिसरात असणाऱ्या म्हाडा सोसायटीजवळ घडला. याप्रकरणी अटक केलेल्या सोनू कपूर सिंह टाक याच्यासह दोन जणं परिसरातील एका घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. दरोडा टाकण्यासाठी लागणारे सर्व धारधार हत्यारे त्यांनी सोबत ठेवले होते. यावेळी त्याठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली.

वारजे पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना तिघे जणं दरोडा टाकण्याच्या तयारी करत असल्याचं दिसून आले. पोलिसांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग केला असता यातील दोघे जण फरार झाले, तर या थरारत पोलिसांना एकाला ताब्यात घेण्यात यश आले.

अटक केलेल्या सोनूकडून २.५ किलो चांदीचे दागिने जप्त

२९ वर्षीय अटक केलेल्या सोनू टाक या आरोपीने पुण्यात आत्तापर्यंत विविध ठिकाणी चोरी केली आहे. त्याच्यावर पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात चार, नेरूळ पोलिस ठाण्यात दोन तर चतुशृंगी, सांगवी, देहू रोड आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. सोनू याच्यासोबत सचिन वाघमारे, सलीम, बाबा आणि त्याचा साथीदार याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT