Bee Soldiers : चीनची मधमाशांना मिलिटरी ट्रेनिंग; कोरोना, माशीड्रोननंतर मधमाशी सैन्य,VIDEO

China Threat : कोरोनानंतर चीननं पुन्हा एकदा जगाला टेन्शन द्यायला सुरुवात केलीये. यावेळी चीनने पुन्हा निसर्गाची साखळी बिघडवलीये. हो, चिनने चक्क मधमाशांना सैनिकी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलीये. पाहूया चिनच्या या नव्या सैनिकांवरचा एक रिपोर्ट...
China
China Threat newsSaam tv
Published On

चीन, जगातील भूप्रदेशाच्या तुलनेत अवघ्या 6.4% इतकाच. पण या इतक्या भूप्रदेशानं जगाचं टेन्शन कायमच वाढवलंय. याच चीननं कोरोनाला जन्माला घालून जगावर या शतकातील सगळ्यात मोठं संकट आणलं. त्याच चीननं आता सैनिकी बळ वाढवण्याच्या नादात आपल्या सैन्यात चक्क मधमाशांना सामिल करुन आपली राक्षसी महत्वाकांक्षा जगाला दाखवून दिलीय. चीननं मधमाशांचा वापर करुन शत्रुवरील हल्ल्याची नेमकी काय रणनिती आखलीये. पाहूया..

चीनचे मधमाशी सैनिक

मधमाशांची फौज बनणार गुप्तहेर

चीननं बनवली ब्रेन कंट्रोलर मशीन

डिव्हाइसचं वजन फक्त 74 मिलीग्राम

मधमाशांच्या पाठीवर लावणार डिव्हाइस

सूक्ष्म पीन मधमाशांच्या मेंदूत घालून हालचालींवर नियंत्रण ठेवणार

मधमाशा चीनी आदेशानं उडणार

China
Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांनी मधमाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात छोटं ‘ब्रेन कंट्रोलर’ तयार केलं आहे. हे जगातील सर्वात हलकं ब्रेन कंट्रोलर असून त्यामुळे मधमाशांना रोबोटसारखं उडवलं जाऊ शकतं. डिव्हाइस मधमाशीच्या पाठीवर बसवून 3 सूक्ष्म सुईंच्या साहाय्याने त्यांच्या मेंदूत लहान छिद्रं केली जातात, ज्यामुळे मधमाशांमध्ये एक भ्रम निर्माण होतो आणि त्या आदेशानुसार उडू लागतात.

चीननं वाढवलं जगाचं टेन्शन

कोरोना महामारीचं जन्मस्थान

तैवानवर हक्क आणि भारताच्या सीमा बळकावण्याची दादागिरी

बनावट औषधं आणि उत्पादनात आघाडी

गरीब देशांना मदतीच्या नावानं कर्ज देऊन गुलाम करणं

चीनकडून जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करत प्रदूषण

हायपरसोनिक मिसाईल आणि माशीड्रोनची निर्मिती

China
Pune Bhide Bridge : भिडे पूल कधी सुरु होणार? वाहतूक कोंडीने पुणेकर वैतागले; दहीहंडी, गणेशोत्सवाआधी प्रश्न सोडवण्याची मागणी

चीननं आजवर आपल्या हेकेखोर, साम्राज्यवादी भूमिकेनं जगाला ताप दिलाय. आपलं लष्करी सामर्थ्य वाढवून जगात हेरगिरी करण्यासाठी चिन्यांनी या आधी एक माशी ड्रोन बनवला. आणि आता चक्क मधमाश्यांच्या वापर करुन चीन चक्क आपल्या ताफ्यात मधमाश्यांना देखील कामाला लावतेय. मधमाशा आपल्या मधानं जगाला गोडवा देत आल्या असल्या तरी निर्सगावर वर्चस्व गाजवणारा हा चिनी प्रयोग जर यशस्वी झाला तर त्याचा परिणाम भविष्यात संपूर्ण जगाला भोगावा लागेल. एवढं मात्र खरंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com