73-YEAR-OLD MAN BOOKED FOR MOLESTING RECEPTIONIST IN PUNE CLINIC Saam TV News
मुंबई/पुणे

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Receptionist Harassed by 73-Year-Old in Clinic: पुण्यात ७३ वर्षीय वृद्धाने क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल. पोलिस तपास सुरू असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका ७३ वर्षीय वृद्धाने २७ वर्षीय तरूणीसोबत अश्लील वर्तन केलं आहे. तसेच तिच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरूणी एका खासगी क्लिनिकमध्ये काम करीत असून, पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पुण्यातील विश्रामबाग रोड परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये घडली. ३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ७३ वर्षीय वृद्ध क्लिनिकमध्ये त्यावेळेस तरूणी त्या ठिकाणी उपस्थित होती. तरूणी एकटी असल्याचं पाहताच वृद्ध व्यक्तीने संधी साधली.

आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन करण्यास सुरूवात केली. तसेच रिसेप्शनिस्टच्या गालाला हात लावत 'पप्पी दे' अशी विकृत मागणी केली. त्यानंतर आरोपीने खिशात हात घातला, आणि पीडितेला, 'माझ्याकडे पैसे आहेत. तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे काही हवंय, ते मी तुला देतो, पण तू मला जे पाहिजे ते कर', असं म्हणत तरूणीचा विनयभंग केला.

या घटनेनंतर तरूणी घाबरली. ती क्लिनिकमधून पळाली. वृ्द्धाने तिचा पाठलाग केला. तिला जवळ धरलं, आणि 'उद्या तू क्लिनिकमध्ये आहेस ना?' असा प्रश्न विचारत तिला मानसिक त्रास दिला. वृद्धाच्या याच त्रासाला कंटाळून तिने थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

विश्रामबाग पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करत अटक केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचे पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT