Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Saptashrungi Temple News: परळीत देवी मिरवणुकीदरम्यान माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी कोंबड्याचा बळी देत जादूटोण्याचा अघोरी प्रकार केल्याचा आरोप; गुन्हा दाखल, तपास सुरू.
Former NCP Leader Booked for Black Magic During Parli Procession
Former NCP Leader Booked for Black Magic During Parli ProcessionSaam TV News
Published On

बीडच्या परळी गावात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेच्या मिरवणुकीदरम्यान अंधश्रद्धेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगराध्यक्षांनी रस्त्याच्या मधोमध कोंबड्याचा बळी दिला.तसेच त्याच्यावर नागलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून जादूटोणा करण्याचा प्रकार केला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी माजी नगरध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

परळी गावात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेची मिरवणूक निघाली होती. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरध्यक्ष दीपक देशमुख यांनी रस्त्याच्या मधोमध अघोरी कृत्य केलंय. त्यांनी कोंबड्याचा बळी दिला. नंतर त्याच्यावर नागलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून जादूटोणा करण्याचा प्रकार केला.

Former NCP Leader Booked for Black Magic During Parli Procession
Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

माजी नगरध्यक्षांनी जादूटोणा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढगे यांनी केला. त्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी मिळालं, तसेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला.

Former NCP Leader Booked for Black Magic During Parli Procession
Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

ही घटना सप्तश्रृंगी देवीच्या धार्मिक मिरवणुकीदरम्यान घडल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी दीपक देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. दीपक देशमुख यांनी जादूटोण्याचा प्रकार का केला? मध्यरस्त्यावर कोंबड्याचा बळी देण्यामागचं कारण काय? याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com