
अमरनाथ यात्रेच्या मार्गावरून थरारक बस अपघाताची बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे इतर चार वाहनांवर आदळली. यामुळे अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या किमान ३६ यात्रेकरूंना किरकोळ दुखापत झाली. ही बस जम्मूतील भगवती नगर येथून दक्षिण काश्मीरमधील पहलगाम बेस कॅम्पच्या दिशेनं जात होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चंद्रकूटजवळ सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या बसने इतर चार बसला धडक दिली. ही बस इतकी जबर होती की, किमान ३६ यात्रेकरू गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
नेमकं घडलं काय?
रामबनचे उपायुक्त मोहम्मग अल्यास खान म्हणाले की, 'पहलगामच्या ताफ्यातील शेवटच्या वाहनाचे चंद्रकोट लंगर या ठिकाणी नियंत्रण सुटले. नंतर बस थेट ४ वाहनांवर आदळली. या धडकेत एकूण ४ वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच बसमधील भाविक देखील गंभीर जखमी झाले आहेत.
तेथील उपस्थित पोलीस, अधिकारी आणि स्थानिकांनी त्याला तातडीने रामबन जिल्हा रूग्णालयात नेले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे', अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.
रामबनचे जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक सुदर्शन सिंह कटोच म्हणाले की, प्राथमिक उपचारानंतर यात्रेकरूंना ताबडतोब घरी सोडवण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खराब झालेल्या बसेस पाठवण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.