
बिहारची राजधानी पाटणा येथून उद्योगपतीच्या हत्येची घटना उघडकीस आली आहे. पाटणाच्या गांधी मैदानात काही गुन्हेगारांनी मिळून उद्योगपती गोपाळ खेमका यांची गोळ्या झाडून हत्या केली. खेमका हे पाटण्यातील एक मोठे व्यापारी होते. ते मगध रूग्णालयाचे मालकही होते. दरम्यान, खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका याची देखील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या परिसरात आरोपींनी अशाच पद्धतीने हत्या केली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेच्या दिवशी गोपाळ खेमका हे गांधी मैदान राम गुलाम चौक येथील त्यांच्या घराजवळ कारमधून खाली उतरत होते. यादरम्यान, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह सर्व उच्च अधिकारी पोहोचले. तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस नेमकं काय म्हणाले?
घटनेबाबत माहिती देताना पाटणा सेंट्रलच्या एसपी दीक्षा म्हणाल्या, '४ जुलैच्या रात्री गांधी मैदान येथील एका अपार्टमेंटजवळ एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी आली. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. घटनास्थळावरून एक गोळी जप्त करण्यात आली आहे. तसेच एफएसएल टीमला देखील बोलवण्यात आलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.'
पोलिसांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, 'माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, आरोपी हे दुचाकीवरून आले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे'.
दरम्यान, आरोपींनी गोपाळ खेमका यांची गोळ्या घालून हत्या का केली? या हत्येमागे कुणाचं षडयंत्र आहे? याचा सखोल तपास केला जात आहे. दरम्यान, प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.