Pune Domestic Harassment Case Saam Tv News
मुंबई/पुणे

सासरच्या छळाला कंटाळली, विवाहितेनं घरातच आयुष्य संपवलं; माहेरच्या मंडळींना वेगळाच संशय

Pune Domestic Harassment Case: पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. आंबेगाव पठार परिसरातील धक्कादायक घटना. पोलिसांकडून गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात.

Bhagyashree Kamble

  • पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

  • आंबेगाव पठार परिसरातील धक्कादायक घटना

  • मृत महिलेचं नाव स्नेहा विशाल झेंडगे

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एका धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

स्नेहा विशाल झेंडगे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात तिचं सासर होतं. गेल्या काही महिन्यांपासून तिचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता, असा आरोप विवाहितेच्या घरच्यांनी केला आहे. याच छळाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचललं.

राहत्या घरातच तिनं गळफास घेत आयुष्य संपवलं. या प्रकरणाची माहिती विवाहितेच्या घरच्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

स्नेहाच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींविरोधात गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून या दिशेनं देखील तपास सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण प्रचंड तापलं. राज्यभरातील सामान्य आणि नेत्यांनी रोष व्यक्त केला. मात्र, आता पुण्यातच पुन्हा एकदा विवाहितेच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

Maratha Reservation: छगन भुजबळांच्या नाराजीवर सुनील तटकरे म्हणाले.. VIDEO

OBC Reservation: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे २- २ सदस्य; ओबीसी समाजाची उपसमिती काय काम करणार?

Tapalwadi Waterfall : पावसात लांब कशाला? मुंबईतच वसलाय स्वर्गाहून सुंदर टपालवाडी धबधबा

SCROLL FOR NEXT