...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde Joins Runners: ठाणे महापालिकेच्या वतीने ३१ वी वर्षा मॅरेथॉन आयोजित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन आणि फ्लॅग ऑफ. २१ किमीच्या मुख्य मॅरेथॉनसह अनेक धावपटूंचा सहभाग.
Thane Varsha Marathon
Thane Varsha MarathonSaam Tv News
Published On
Summary
  • ठाणे महापालिकेच्या वतीने ३१ वी वर्षा मॅरेथॉन आयोजित

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन आणि फ्लॅग ऑफ

  • २१ किमीच्या मुख्य मॅरेथॉनसह अनेक धावपटूंचा सहभाग

  • शिंदे यांनी धाव घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आज ठाणे महापालिकेच्या वतीने ३१ वी वर्षा मॅरेथॉन भव्यदिव्य उत्साहात आयोजित करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मॅरेथॉनला जल्लोषात सुरुवात झाली. शिंदेंच्या हस्ते २१ किमी अंतराच्या मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ देण्यात आला. या स्पर्धेत शहरातील तसेच परिसरातील अनेक धावपटूंनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःही या मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. त्यांच्या धावतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आज ठाणेकरांनी वर्षा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. या मॅरेथॉनची सुरूवात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जल्लोषात सुरूवात झाली. मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे महापालिकेचे आयुक्तही उपस्थित होते. यावेळी अनेक धावपटूंनी सहभाग घेतला. यावेळी एकनाथ शिंदेंनीही सहभाग घेतला होता.

Thane Varsha Marathon
लहान पोरांचं भांडण, आजोबांचाच जीव गेला; रस्त्यावर रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?

त्यांचा धावत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांनी उद्घाटनप्रसंगी लांब धाव घेतली. या मॅरेथॉनआधी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो अन् भावांनो..वर्षा मॅरेथॉनचं घोषवाक्य, मॅरेथॉन ठाण्याची उर्जा तरूणाची. मी यावेळी एक होर्डिंग पाहिले. तू धाव...तू धाव..क्षितिजाचा ठाव.. आपण शहर, राज्य अन् देशासाठी धावायचे असते. ठाण्याचा विकास झाला आहे. ठाणे आता बदलत आहे. ठाणे विकसित होत आहे'.

Thane Varsha Marathon
प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण हवाच! 100 वर्षांच्या बहिणीनं 104 वर्षांच्या लाडक्या भावाला बांधली राखी

'ठाणे शहरात अर्बन फॉरेस्ट आपण केलंय. सेंद्रीय शेती महापालिकेनं सुरूवात केली आहे. ठाण्याची शान स्टेडियम देखील चांगले आहे. नुतनीकरणाला आधी २३ मग ८कोटी मिळाले. अजून काय पाहिजे... खेळाडू आणि स्टेडियमसाठी पैसे कमी पडणार नाही', असं यावेळी शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com