लहान पोरांचं भांडण, आजोबांचाच जीव गेला; रस्त्यावर रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?

Senior Citizen Killed in Argument: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वयोवृद्धावर चाकू हल्ला. किरकोळ वादातून भगवान गायकवाड यांची हत्या. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
Crime News
Crime Newsx
Published On
Summary
  • धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वयोवृद्धावर चाकू हल्ला

  • किरकोळ वादातून भगवान गायकवाड यांची हत्या

  • गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

  • आरोपी नागेश गावितला पोलिसांची अटक

लहान मुलांच्या भांडणाचा वाद चिघळल्यानं तरूणाने एका वयोवृद्ध व्यक्तीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तरूणाला अटक केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या जुनी सांगवी गावात ही धक्कादायक घटना घडली. नागेश एकनाथ गावित असे हल्लेखोर व्यक्तीचे नाव आहे. तर, भगवान लक्ष्मण गायकवाड (वय वर्ष ५६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नागेश गावित यांच्या मुलाचा आणि भगवान गायकवाड यांच्या नातवाचा क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला होता.

Crime News
प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण हवाच! 100 वर्षांच्या बहिणीनं 104 वर्षांच्या लाडक्या भावाला बांधली राखी

या घटनेचा जाब विचारण्यासाठी भगवान गायकवाड भावांसह नागेश गावित यांना भेटायला गेले. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाला. यानंतर नागेश गावित यांना राग अनावर झाला. त्यानं थेट भगवान यांच्यावर चाकूने हल्ला केला. पोटाच्या डाव्या बाजूला, बरगडीवर आणि मानेवर सपासप वार केले.

या हल्ल्यात भगवान गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, यावेळी उपचारादरम्यान भगवान गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी नागेश गावित याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

Crime News
रक्षाबंधनाच्या दिवशी चिमुकल्याचा मृत्यू; बहिणीनं थंड हातावर राखी बांधून दिला निरोप, गाव शोकसागरात बुडाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com