रक्षाबंधनाच्या दिवशी चिमुकल्याचा मृत्यू; बहिणीनं थंड हातावर राखी बांधून दिला निरोप, गाव शोकसागरात बुडाला

Heartbreaking Raksha Bandhan: नाशिकच्या वडणेर दुमाला गावात बिबट्याने ३ वर्षीय आयुष भगतचा जीव घेतला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने मृत भावाला राखी बांधून निरोप दिला. गावभर दुःख आणि भीतीचं सावट पसरलं आहे.
Heartbreaking Raksha Bandhan
Heartbreaking Raksha BandhanSaam Tv News
Published On
Summary

नाशिकच्या वडणेर दुमाला गावात बिबट्याने ३ वर्षीय आयुष भगतचा जीव घेतला.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने मृत भावाला राखी बांधून निरोप दिला.

गावभर दुःख आणि भीतीचं सावट पसरलं आहे.

वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला असून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

नाशिकच्या वडणेर दुमाला गावात रक्षाबंधनाच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात एका ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, या दुःखद प्रसंगात त्याची नऊ वर्षांची बहिण साश्रूनयनांनी भावाच्या थंड हातावर राखी बांधून निरोप देताना दिसली. हे हृदयद्रावक दृश्य पाहून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला.

ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. आयुष भगत (वय वर्ष ३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ३ वर्षीय चिमुकला रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडप घातली. नंतर त्याला उचलून नेलं. काही वेळानंतर त्याचा मृतदेह सापडला. आज रक्षाबंधन. चिमुकल्याला देखील ९ वर्षांची बहीण आहे.

Heartbreaking Raksha Bandhan
रक्षाबंधनासाठी घराकडे निघाला, मालगाडीनं उडवलं; एकुलत्या एक भावाच्या मृत्यूनंतर बहीण पोरकी

बहिणीला भावाच्या मनगटावर राखी बांधून सण साजरा करायचा होता. दरम्यान, अंत्यसंस्कारापूर्वीच तिने भावाच्या थंड हातावर राखी बांधली आणि अश्रूंनी निरोप दिला. या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तर आलंच, तसेच गावभर हळहळ व्यक्त झाली. बहिणीचं हे रक्षाबंधन आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडं बनलं आहे.

Heartbreaking Raksha Bandhan
ओला - उबर सोडा, आता सरकारी टॅक्सीतून फिरा, कमी दरात उत्तम सेवा; पहा कुठे अन् कधी सुरू होणार?

बिबट्यानं चिमुकल्यावर केलेल्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे सावट पसरलं आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर भगत कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, गावात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com