
रक्षा बंधनाच्या दिवशी घरी जाताना रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू
मेजा रोड स्टेशनवर मालगाडीची धडक लागून युवक जागीच ठार
फुट ओव्हरब्रिज नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप
घटनेनंतर परिसरात हळहळ आणि प्रशासनाविरोधात रोष
रक्षा बंधनाच्या दिवशी बहिणीला राखी बांधण्यासाठी घरी निघालेला भाऊ रेल्वे अपघाताचा बळी ठरला. रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना त्याला मालगाडीने जोरदार धडक दिली आणि जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एकुलत्या एक भावाच्या मृत्यूने बहिणीला मोठा धक्का बसला आहे. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या गंगापार परिसरात घडली असून, या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मेजाखासच्या पटेल बस्तीतील रहिवासी अरविंद सिंग पटेल यांचा मोठा मुलगा, २२ वर्षीय अमर सिंग, इटावा जिल्ह्यातील वाहतूक विभागात कंत्राटावर वाहन दुरुस्तीचे काम करत होता. गुरुवारी रात्री ट्रेनने घरी जाण्यासाठी तो निघाला होता. शुक्रवारी सकाळी मेजारोड येथे पोहोचून स्टेशनवर उतरल्यावर तो डीएफसी लाईन ओलांडत असताना अपघात झाला.
एक मालगाडी आली. मालगाडीच्या घडकेमुळे अमर सिंह रेल्वे रूळावरून दुरवर फेकला गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटताच कुटुंबाने रेल्वे स्टेशनवर धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी पंचनामा केला.
तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. कुटुंबाला या घटनेची माहिती मिळताच त्यांच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला. एकूलत्या एक भावाच्या मृत्यूनंतर बहिणीलाही अश्रू अनावर झाले. मेजा रोड रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या स्थानिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. फुट ओव्हरब्रिजचे बांधकाम न झाल्यामुळे प्रवासी दररोज अपघातांचे बळी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फुट ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली. मात्र, अद्याप पूर्ण न झाल्यामुळे स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.