
भारत टॅक्सी ओला-उबरला टक्कर देणार
सहकारी तत्वावर अॅप आधारित सेवा
पहिल्या टप्प्यात ४ राज्यांत सुरूवात
चालक कल्याण आणि स्वस्त दरावर भर
भारतभर कार्यरत असलेल्या खासगी अॅप-आधारित टॅक्सी सेवांना, विशेषतः ओला आणि उबरला, जोरदार आव्हान देण्यासाठी "भारत टॅक्सी" ही नवी सहकारी टॅक्सी सेवा लवकरच सुरू होत आहे. केंद्रीय सहकार विभागाच्या पुढाकाराने ही सेवा सुरू होणार असून, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ती उपलब्ध होईल.
सहकारमंत्री अमित शहा यांनी डिसेंबरपूर्वी देशात सहकारी तत्वावर अॅप-आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, भारतीय कृषी फर्टिलायझर सहकारी संस्था लि., गुजरात सहकारी दुग्ध विकास संस्था यांसह आठ सहकारी संस्थांच्या सहभागातून "बहुराज्य सहकारी टॅक्सी सेवा संस्था" स्थापन करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी ३०० कोटींचे भांडवल उभारण्यात येणार आहे. यात थेट सरकारचा सहभाग नसणार आहे. भारतीय कृषक सहकारी संस्था, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि राष्ट्रीय सहकार निर्यात यादेखील संस्था सहकारी टॅक्सी संस्थेच्या भागधारक असणार आहेत.
ओला, उबर यांसारख्या खासगी कंपन्यांकडून टॅक्सी चालकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी तसेच सामान्यांना किफायतशीर दरात टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आणली जात असल्याची माहिती राष्ट्रीय सहकार विकास महामंडळातील सुत्रांनी दिली आहे.
टप्प्याटप्प्यानं देशभरात सेवा सुरू
भारत सेवा टॅक्सी ही सेवा टप्प्याटप्प्यानं देशभरात सुरू केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यात सुरू केली जाणार आहे.
यासाठी आतापर्यंत २०० टॅक्सी चालकांची नोंदणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.