प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण हवाच! 100 वर्षांच्या बहिणीनं 104 वर्षांच्या लाडक्या भावाला बांधली राखी

Ahilnyanagar Raksha Bandhan: अहिल्यानगर जिल्ह्यातील जोगेश्वरी आखाडा येथे ऐतिहासिक रक्षाबंधनाचा प्रसंग. १०० वर्षांच्या बहिणीने १०४ वर्षांच्या भावाच्या हातात राखी बांधली. भावंडांमध्ये फक्त चार वर्षांचं वयाचं अंतर.
Ahilyanagar rakhsha bandhan
Ahilyanagar rakhsha bandhanSaam Tv News
Published On
Summary
  • अहिल्यानगर जिल्ह्यातील जोगेश्वरी आखाडा येथे ऐतिहासिक रक्षाबंधनाचा प्रसंग

  • १०० वर्षांच्या बहिणीने १०४ वर्षांच्या भावाच्या हातात राखी बांधली

  • भावंडांमध्ये फक्त चार वर्षांचं वयाचं अंतर

  • सोशल मीडियावर हा शतायुषी रक्षाबंधनाचा प्रसंग व्हायरल

देशभरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या या पवित्र नात्याच्या दिवशी सर्वत्र घराघरात आनंदाचे वातावरण आहे. बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. आज सर्वत्र रक्षाबंधन साजरे होत असताना अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे एक अनोखे रक्षाबंधन साजरे झाले आहे. १०० वर्ष वयाच्या बहिणीने १०४ वर्षांच्या भावाला राखी बांधली आहे. सध्या दोघांचे फोटो व्हायरल होत आहे.

सध्याच्या युगात अनेक नाती कमकुवत होत असताना आपण पाहिलं असेल. पण बहीण भावाचं नातं प्रेमळ असतं. या नात्याला कधीच तडा जाऊ शकत नाही. आता अहिल्यानगरमधील भाऊ बहिणीचं नातं पाहा ना.. १०० वर्षांच्या बहिणीनं आपल्या १०४ वर्षांच्या भावाला राखी बांधून रक्षा बंधन साजरा केला आहे.

Ahilyanagar rakhsha bandhan
वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

हे आजी आजोबा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रहिवासी. जोगेश्वरी आखाडा येथील ह.भ.प नारायण डौले (वय वर्ष १०४) त्यांची धाकटी बहीण पार्वतीबाई भुजाडी (वय वर्ष १००) या बहीण भावामध्ये फक्त ४ वर्षांचं अंतर आहे. दोघेही गोडीनं आपलं बहीण भावाचं नातं जपत आहेत. शंभरी पार केली असली तरी, आज त्यांनी त्याच आनंदात रक्षाबंधन सण साजरा केला आहे.

सध्या सोशल मीडियावर दोघांचा रक्षाबंधन साजरा करत असतानाचे फोटो व्हायरल होत आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे होते. या शतायुषी रक्षाबंधनाने अनेकांना भावूक केले असून, त्यांच्यातील अतूट नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Ahilyanagar rakhsha bandhan
रक्षाबंधनाच्या दिवशी चिमुकल्याचा मृत्यू; बहिणीनं थंड हातावर राखी बांधून दिला निरोप, गाव शोकसागरात बुडाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com