पोटाचे टायर्स दिसतात, शरीर सुटतच चाललंय? पाण्यात मिसळा '१' पदार्थ, बाबा रामदेव सांगतात झरझर घटेल वजन

Ramdev Baba’s Diet and Lifestyle Tips: लठ्ठपणाचे मुख्य कारण असंतुलित जीवनशैली आणि चुकीचा आहार. लिंबू पाणी, भोपळ्याचा रस, त्रिफळा, आले-लिंबू चहा हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर. रात्री ७ नंतर जेवण टाळणे आणि लवकर झोपणे गरजेचे.
Baba Ramdev Weight Loss Tips
Baba Ramdev Weight Loss TipsSaam Tv News
Published On
Summary
  • लठ्ठपणाचे मुख्य कारण असंतुलित जीवनशैली आणि चुकीचा आहार.

  • लिंबू पाणी, भोपळ्याचा रस, त्रिफळा, आले-लिंबू चहा हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.

  • रात्री ७ नंतर जेवण टाळणे आणि लवकर झोपणे गरजेचे.

  • लवकर उठणे आणि नियमित सवयी ठेवणे आरोग्यासाठी आवश्यक.

आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित जीवनशैलीमुळे वजन वाढणे ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव आणि ध्यान न करण्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने वाढते. यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओद्वारे वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. या उपायांनी शरीरातील चरबी नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होते.

वजन वाढण्याची मुख्य कारणे

बाबा रामदेव यांच्या मते, वजन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की बिघडलेली जीवनशैली, योग्यवेळी न खाणे, फास्ट फूड खाणे, औषधांचे दुष्परिणाम आणि झोपेचा अभाव. या कारणांमुळे लोकांचे वजन झपाट्यानं वाढते.

Baba Ramdev Weight Loss Tips
लोणावळ्यातील भुशी डॅमवर तरूणाचा किळसवाणा प्रकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी फायदेशीर ठरू शकते. तसेच रात्री भात आणि पोळी खाणं टाळा. भोपळ्याचा रस नियमितपणे प्या. जेवणापूर्वी सॅलड खा. रात्री ७ वाजण्यापूर्वी जेवण करा. त्यानंतर जेवण करणे टाळा. जेवण केल्यानंतर १ तासानं पाणी प्या. या टिप्समुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात त्रिफळा घाला आणि प्या. त्रिफळा पचनक्रिया सुधारते. तसेच वजन कमी करण्यास मदत करते. नियमित आले लिंबू घालून चहा तयार करा आणि प्या. आले वजन नियंत्रित करण्यास प्रभावी आहे. याशिवाय ३-६ दालचिनी पाण्यात घालून उकळा. त्यात १ चमचा मध मिसळा आणि प्या. या उपायामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.

लवकर उठणे वजन कमी करण्यासाठी तसेच निरोगी राहण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. स्वत:चे वेळापत्रक बनवा. शरीराला दररोज लवकर उठण्याची सवय लावा. झोपेची वेळ निश्चित करा. तसेच रोज रात्री कोमट पाणी प्या आणि झोपा.

Baba Ramdev Weight Loss Tips
वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com