Crime News  Saam
मुंबई/पुणे

Pune Crime News : संशयाचं भूत डोक्यात शिरलं, पतीने डोक्यात कुऱ्हाडीने वार करत पत्नीला संपवलं

Husband Killed wife in Pune : पूजा लखन कांबळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. लखन बालाजी कांबळे असं अटक केलेल्या आरोपी पतीने नाव आहे.

प्रविण वाकचौरे

Pune News :

चारित्र्याच्या संशयावरुन २५ वर्षीय पत्नीची डोक्यात कुऱ्हाड टाकून हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील वारजे येथील कर्वेनगर परिसर मंगळवारी या घटनेने हादरला. आरोपी पतीला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पूजा लखन कांबळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. लखन बालाजी कांबळे असं अटक केलेल्या आरोपी पतीने नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा आणि लखन मुळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहेत. मात्र पुण्यातील कर्वेनगर परिसरात ते गेल्या काही वर्षांपासून राहत होते. (Crime News in Marathi)

लखन हा पत्नी पूजावर सतत चारित्र्यावरुन संशय घेत असे. घरात या विषयावरुन त्यांच्यात सतत खडके उडत असत. मंगळवारी सकाळी देखील याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. मात्र या भांडणानंतर कुणालाही कल्पना नसेल असं विपरित घडलं. (Latest Marathi News)

दोघांमध्ये भांडणावेळी शब्दाला शब्द वाढत गेले. यावेळी रागाच्या भरात लखनने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे पूजाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी लखनने तेथून पळ काढला आणि थेट त्याचं मूळ गाव गाठलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीचा शोध सुरु केला. आरोपी लखनला पोलिसांना यवतच्या दिशेने जात असताना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT