Pune Viral Video: न्यू ईयरचा पहिला दिवस आणि मालकाला दिला जोर का झटका, नेमकं प्रकरण काय?

Pune Crime News: न्यू ईयरच्या पहिल्याच रात्री एका कामगारानं आपल्याच मालकाला दणका दिलाय. हा गडी तीन कोटींचे सोने घेऊन पसार झालाय. ही घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय.
Pune Viral Video
Pune Viral VideoSaam TV
Published On

Pune Crime News:

न्यू ईयरच्या पहिल्याच रात्री एका कामगारानं आपल्याच मालकाला दणका दिलाय. हा गडी तीन कोटींचे सोने घेऊन पसार झालाय. ही घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय.

या सीसीटीव्हीत दुकानातील सर्व चित्र दिसतंय. हा गडी दबक्या पावलांनी दुकानाच्या इथं आला. त्यानंतर एका डुप्लिकेट चावीच्या मदतीने या दुकानांच डोअर ओपन केलं. डोअर ओपन केल्यानंतर त्याने दुकानाची तिजोरी पाहण्यास सुरूवात केली. ही तिजोरी दुकानाच्या एका कॉर्नरला ठेवण्यात आली होती. ज्याप्रमाणे बनावट चावीने डोअर उघडला. त्याचप्रमाणे तिजोरीही उघडली. या तिजोरीत तब्बल ३ कोटींचे सोने आणि १० लाखांची रोकड ठेवली होती. या गड्यानं सर्व सोनं आणि रोकडही आपल्या बॅगेत भरलं आणि तो पसार झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Viral Video
Maharashtra Politics: 'शिंदे गटाचे 7 खासदार भाजपकडून निवडणूक लढवण्यास तयार'

पुण्यातील राज कास्टिंग या दुकानात ही घटना घडली. दीपक माने हे या दुकानाचे मालक आहेत. त्यांचा धायरी येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास. या गड्यानं दुकानात धाड टाकली आणि सर्व सोने घेऊन फरार झाला.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, माने नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात आले आणि त्यांचं तिजोरीवर लक्ष गेलं. पण तिजोरीतील सर्व दागिने आणि रोख रक्कम लंपास झाले होते. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि या आरोपीबाबत गुन्हा दाखल केला.

Pune Viral Video
Hit and Run Law Protest: मोठी बातमी! हिट अँड रन कायदा तूर्तास लागू होणार नाही; गृह सचिवाचं ट्रकचालक संघटनांना आश्वासन

या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली. यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने यांचा सराफी व्यवसाय आहे. ते दागिने बनवण्याचे काम करतात. ते आपले सर्व दागिने या तिजोरीत ठेवायचे. गेल्या सात वर्षांपासून दीपक हा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे अनेक कामगारांनी काम केलंय. पण आता याच कामगारांपैकी एका गड्यानं त्यांना हिसका दाखवलाय. त्यामुळे पोलिसांची पुढील अॅक्शन काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com