Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात सराफी व्यावसायिकाचे दुकान लुटले; तब्बल साडेतीन कोटींचा ऐवज लंपास; घटना CCTVत कैद

Pune Crime: ३१ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी बनावट चावीने दुकान आणि तिजोरी उघडून पाच किलो ३२३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दहा लाख ९३ हजारांची रोकड चोरून नेली.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. ३ जानेवारी २०२४

Pune Crime News:

पुणे (Pune) शहरातून जबरी चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यामधील रविवार पेठेतील सराफ दुकानातून चोरट्यांनी पाच किलोंहून अधिक सोन्याचे दागिने आणि दहा लाख ९३ हजारांची रोकड असा सुमारे तीन कोटी ३२ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी (१ जानेवारी) हा प्रकार उघडकीस आला. (Latest Marathi News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार पेठेत फिर्यादी यांचे सराफ दुकान आहे. या दुकानात दागिने घडवून त्याची सराफ बाजारातील इतर दुकानांमध्ये विक्री केली जाते. ३० डिसेंबर रोजी फिर्यादी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून बाहेर गेले होते. ३१ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी बनावट चावीने दुकान आणि तिजोरी उघडून पाच किलो ३२३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दहा लाख ९३ हजारांची रोकड चोरून नेली.

सोमवारी (१ जानेवारी) हा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादीने दुकानातीलच काही कारागिरांनी संगनमत करून ऐवज चोरी केल्याचाही आरोप केला आहे. या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या प्रकरणी फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या जबरी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News in Marathi)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT