Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: भय इथले संपत नाही! पुण्यात कोयत्याची दहशत कायम, विसर्जनाच्या दिवशी दोघांची हत्या

Koita Attack On 2 People In Pune: पुण्यामध्ये कोयता हल्ल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. एका महिलेची आणि एका तरुणाची कोयत्याने हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनांमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये कोयत्याची दहशत वाढतच चालली आहे. या नाही तर त्या घटनेमध्ये कोयत्याने हल्ले केले जात आहेत. अशामध्येच पुण्यामध्ये कोयता हल्ल्याच्या आणखी दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी २ जणांची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून एका महिलेच्या डोक्यामध्ये कोयत्याने हल्ला करत तिची हत्या करण्यात आली. तर एका कामगाराची कोयत्यानेच हल्ला करत हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनेने पुणे हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या विश्रांतवाडीमध्ये महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. कळस मारवाडी येथे ही घटना घडली. प्रेम प्रकरणातून या महिलेच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्याची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी झालेल्या महिलेला पोलिसांनी तात्काळ ससून रुग्णलयात दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

तर दुसरी घटना पुण्याच्या बावधन परिसरात घडली आहे. बावधन परिसरात कामगाराची हत्या करण्यात आली. तुषार बालवडकर यांच्या जागेत ग्रीन ड्रीम नर्सरी बावधन या ठिकाणी या कामगाराची हत्या करण्यात आली. प्रवीण कुमार भोला महतू (२६ वर्षे) असं या तरुणाचे नाव असून अज्ञात व्यक्तीने त्याची हत्या केली. प्रवीण मूळचा बिहारचा होता. कोयत्याने त्याच्या गळ्यावर वार करत हत्या करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

SCROLL FOR NEXT